AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोली आश्रमशाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, यंत्रणेला तातडीचा आदेश!

संबंधित शाळेत शिक्षक नसेल, वॉर्ड नसेल,  शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा दिली जात नसेल तर या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गडचिरोली आश्रमशाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, यंत्रणेला तातडीचा आदेश!
gadchiroli ashram school and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 3:06 PM
Share

Gadchiroli Ashram School : गडचिरोली येथील धानोरा तालुक्यातील जपतलाईत येथील आश्रमशाळेत धक्कादायक घटना घडली. या आश्रमशाळेत एकूण तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रात्री झोपेत असताना सापाने दंश केल्यामुळे या विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. एका विद्यार्थिनीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आश्रमशाळा चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीचा आदेश दिला आहे. या शाळेचा परवाना कायमस्वरुपी रद्द करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्री संत्पत, माफ कसे करावे?

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आश्रमशाळा ही काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांची आहे. ते 3 वेळा आमदार, एकदा खासदार राहिलेले आहेत. असे अनुभवी नेते अशा प्रकारे आश्रमशाळा चालवत असतील तर आणि लहान मुलींच्या सुरक्षेशी खेळत असतील, तर माफी कशी द्यावी, अशी भूमिका आदिवासी मंत्र्यांनी घेतली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी समाजातील मंत्र्यांनी ही संतप्त भूमिका मांडली.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय आदेश दिला?

संबंधित शाळेत शिक्षक नसेल, वॉर्ड नसेल,  शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा दिली जात नसेल तर या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्याने तपासणी केली आणि अहवाल दिला, त्याला निलंबित करा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा. आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, असाही तातडीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वकष तपासणीची यंत्रणा उभी करा. सर्व विभागांना त्यात समाविष्ट करा, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

न्हा दाखल करण्याचीही सूचना दिली

आश्रम शाळेच्या प्रकरणावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनही प्रतिक्रिया दिली आहे. आदिवासी आश्रम शाळा आहे, त्यात स्पेशल आॅडिट करावे, अंतर्गत असलेल्या आश्रम शाळांचीदेखील तपासणी करावी. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. आॅडिटमध्ये सापडले तर सोडले जाणार नाही. गुन्हा दाखल करण्याचीही सूचना दिलेली आहे, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत