Rohit Sharma : रोहितने 15 धावा करूनही केलाय मोठा भीमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच!

Rohit Sharma WTC Final 2023 : रोहित शर्मा 15 धावा तर शुबमन गिल 13 धावा करून माघारी गेले.  डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाला हवी तशी सलामी मिळाली नाही. रोहितने 15 धावा केल्या असल्या तरीसुद्धा त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

Rohit Sharma : रोहितने 15 धावा करूनही केलाय मोठा भीमपराक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच!
Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 12:19 AM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल 2023 सामन्यात टीम इंडिया काहीशी बॅकफूटला ढकलली गेली आहे.  कांगारूंचा पहिला डाव 469 धावांवर आटोपला. यामध्ये ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 161 आणि स्टीव्ह स्मिथने 121 धावांची खेळी केली. या खेळींच्या जोरावर कांगारू 400 चा टप्पा ओलांडू शकले, दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांनी घातक मारा करत 469 धावांवर त्यांना गुंडाळलं. त्यानंतर फलंदाजीला आलेले टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी मात्र निराशाजनक सुरूवात केली.

रोहित शर्मा 15 धावा तर शुबमन गिल 13 धावा करून माघारी गेले.  डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाला हवी तशी सलामी मिळाली नाही. विराट कोहली 14, चेतेश्वर पुजारा  14 हे दोघेही स्वस्तार परतले. रोहित शर्माने 15 धावा केल्या असल्या तरीसुद्धा त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी उतरताच रोहित शर्माने एक अनोखा विक्रम केला. 5 वेगवेगळ्या ICC फायनलमध्ये भारतीय डावाची सुरुवात करणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरला आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी-20 वर्ल्ड कप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली होती.

रोहित शर्मा 15 धावा तर शुबमन गिल 13 धावा करून माघारी गेले.  डोंगराएवढ्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाला हवी तशी सलामी मिळाली नाही. विराट कोहली 14, चेतेश्वर पुजारा  14 हे दोघेही स्वस्तार परतले. अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांनी डाव सावरला होता. दोघांमध्ये मोठी भागीदारी होणार असं वाटू लागलं अने जडेजा 48 धावांवर बाद झाला. आता मैदानात रहाणे नाबाद 29 आणि केस एस भरत नाबाद 5 धावांवर आहे. तर कांगारूंकडे आणखीन 318 धावांची आघाडी आहे.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.