AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : टीम इंडियाची युवा ब्रिगेड टी 20I मालिकेसाठी तयार, बांगलादेश विरुद्ध विजयी सुरुवात करणार?

India vs Bangladesh 1st T20i: टीम इंडिया आणि बांगलादेश दोन्ही संघ कसोटीनंतर आता टी 20i मालिकेसाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

IND vs BAN : टीम इंडियाची युवा ब्रिगेड टी 20I मालिकेसाठी तयार, बांगलादेश विरुद्ध विजयी सुरुवात करणार?
team india suryakumar yadavImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 06, 2024 | 5:42 PM
Share

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाची युवा ब्रिगेड बांगलादेश विरुद्ध टी 20I मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. मालिकेतील पहिला सामना हा ग्वाल्हेर येथे न्यू माधवराव शिंदे स्टेडियममध्ये होत आहे. या स्टेडियममध्ये 14 वर्षांनंतर सामना होत आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश दिला. त्यामुळे आता सूर्यकुमार यादव आणि ब्रिगेड बांगलादेशला 3-0 ने पराभूत करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार आहे.

दोन्ही संघ टी 20I वर्ल्ड कप 2024 नंतर आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने बांगलादेशवर टी 20I वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वात बांगलादेश भारतावर विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र त्यात बांगलादेशचा चांगलाच कस लागणार आहे. भारताचा संतुलित संघ आहे. त्यामुळे विजय मिळवणं पाकिस्तानसाठी आव्हानात्मकच असणार आहे.

सूर्याला हार्दिकची साथ

टीम इंडियात युवा खेळाडूंसह कॅप्टन सूर्याच्या सोबतीला ऑलराउंडर हार्दिक पंड्यासह विकेटकीपर संजू सॅमसन या अनुभवी जोडीचीही मदत होणार आहे. त्यामुळे हार्दिक आणि संजू या दोघांवर अनुभवी खेळाडू या नात्याने अधिकची जबाबदारी असणार आहे. संजू अभिषेक शर्मासह ओपनिंग करणार आहे. त्यामुळे संजूवर टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असेल. संजू ओपनिंग करणार असल्याने जितेश शर्मा याचा प्लेइंग ईलेव्हनमधून पत्ता कट झाल्याचं स्पष्ट आहे. तसेच टीम मॅनेजमेंट नितीश रेड्डी आणि मयंक यादव या दोघांपैकी कुणाला पदार्पणाची संधी मिळणार? याकडेही लक्ष असणार आहे.

बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.

टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती