
T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वच टीम्स पावसामुळे हैराण आहेत. बहुतांश सामन्यांवर पावसाच सावट स्पष्टपणे दिसून आलय. टीम इंडियाचा आज बांग्लादेश विरुद्ध सामना अँटीगा येथे होणार आहे. टीम इंडियाला या मॅचच्यावेळी पावसापेक्षा हवेची जास्त चिंता करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेपासून इंग्लंडच्या खेळाडूंनी वेस्ट इंडिजमधील सामन्यात हवा महत्त्वाचा फॅक्टर असल्याच म्हटलं आहे. हवेची दिशा समजून घेणं गरजेच आहे. त्या विरोधात जाणं म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारख आहे. मग पावसाच काय? असा प्रश्न येतो. अँटीगामधील ताज्या हवामानानुसार, पाऊस खेळ बिघडवण्याची शक्यता फार कमी आहे.
बारबाडोसमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडिया थेट अँटीगाला रवाना झाली. तिथे पोहोचल्यानंतर 21 जूनला प्रॅक्टिस सुद्धा केली. त्यावेळी हवामान स्वच्छ होतं. प्रश्न हा आहे की, मॅचच्या दिवशी अँटीगाच हवामान कस असेल?. टीम इंडिया नशिबवान आहे. कारण आतापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपच्या सामन्यात खराब हवामानाचा त्यांना फटका सहन करावा लागलेला नाही. पुढची आव्हान लक्षात घेता, खराब हवामान वाट्याला येऊ नये, हाच टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
असं असेल हवामान
आज अँटींगा येथे भारत-बांग्लादेशमध्ये सामना होणार आहे. यावेळी अँटीगा येथे हवामान कसं असेल? त्या बद्दल जाणून घेऊया. एक्यूवेदर डॉट कॉमनुसार, अँटीगामध्ये या दिवशी पावसाची शक्यता 24 टक्के आहे. हवा 35 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. आकाशात 41 टक्के ढगांची दाटी असेल.
पावसाची शक्यता किती?
भारत-बांग्लादेश सामना स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. एक्यूवेदर डॉट कॉमनुसार त्यावेळी सौम्य पाऊस कोसळू शकतो. याची शक्यता 50 टक्के आहे. त्यावेळी आकाश स्वच्छ आणि सूर्य प्रकाश असेल. म्हणजे अँटीगामध्ये भारत-बांग्लादेश सामन्यावेळी पाऊस कोसळला, तरी त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येणार नाही.
मॅचवर सर्वाधिक प्रभाव कसला असेल?
35 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारा वारा याचा भारत-बांग्लादेश सामन्यावर सर्वाधिक प्रभाव असेल. सेंट लुसियामध्ये इंग्लंड वि दक्षिण आफ्रिका सामन्यावर याच वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव पडला होता. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलरने सामन्यानंतर त्याचा उल्लेख केला होता.