IND vs ENG : टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधून या चौघांचा पत्ता कट! इंग्लंडविरुद्ध कोणते 11 खेळाडू खेळणार?

India Probable Playing Eleven For 1st T20i Against England : टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्यात कोणत्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरणार? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन?

IND vs ENG : टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमधून या चौघांचा पत्ता कट! इंग्लंडविरुद्ध कोणते 11 खेळाडू खेळणार?
team india suryakumar yadav
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 21, 2025 | 10:04 PM

इंग्लंड क्रिकेट टीम 2025 या भारत दौऱ्यातील पहिला टी 20I सामना बुधवारी 22 जानेवारीला खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कोलकातामधील इडन गार्डनमध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. जॉस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा आहे. इंग्लंडने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आपण तयार असल्याचं दाखवून दिलं. तर टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन ही सामन्याआधी टॉस नंतरच स्पष्ट होईल. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी देणार? याकडे याबाबत सर्वांना उत्सूकता आहे.

कुणाला मिळणार संधी?

विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन हा खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे ध्रुव जुरेलला प्रतिक्षा करावी लागेल. संजू आणि अभिेषेक शर्मा ही जोडी सलामीला येईल. त्यानंतर तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी येईल. तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विस्फोटक खेळी केली होती. त्यामुळे तिलककडून इंग्लंडविरुद्धही अशीच खेळी अपेक्षित असणार आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव येऊ शकतो. पाचव्या आणि सहाव्या स्थानी रिंकू सिंह आणि हार्दिक पंड्या खेळण्याची शक्यता आहे. उपकर्णधार अक्षर पटेल सातव्या स्थानी येऊ शकतो.

स्पिनर आणि फास्टर किती?

तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटू असू शकतात. त्यानुसार मोहम्मद शमी याचं वर्षभरापेक्षा अधिक कालावधीनंतर कमबॅक होऊ शकतं. तसेच अर्शदीप सिंह खेळण्याची शक्यता आहे. तर फिरकीपटू म्हणून वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंगटन सुंदर या चौघांना मैदानाबाहेर रहावं लागू शकतं.

पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई .