IND vs ENG 1st T20i : टीम इंडियाने टॉस जिंकला, इंग्लंडविरुद्ध निर्णय काय?
India vs England 1st T20i Toss Update : भारतीय क्रिकेट संघाच्या बाजूने पहिल्या टी 20i सामन्यात नाणेफेकीचा कौल लागला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण आहे? जाणून घ्या.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20i सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नववर्षातील पहिला टॉस जिंकला. सूर्यकुमारने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारतीय चाहत्यांना मोहम्मद शमीच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. मात्र या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हमध्ये मोहम्मद शमी नसल्याचं सूर्यकुमारने टॉस दरम्यान स्पष्ट केलं.
टीम इंडियाचा आठवा सामना
टीम इंडियाचा ईडन गार्डनमधील हा आठवा टी 20i सामना आहे. टीम इंडिया ईडन गार्डनमध्ये 2011 पासून टी 20 मॅचेस खेळत आहे. टीम इंडियाला या मैदानातील पहिल्यावहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता इंग्लंडसमोर टीम इंडियाची गेल्या अनेक वर्षांपासून ईडन गार्डनमध्ये सुरु असलेली विजयी घोडदौड रोखण्याचं आव्हान असणार आहे.
कॅप्टन सूर्यकुमारची आकडेवारी
सूर्यकुमार यादव याचा हा कर्णधार म्हणून 18 वा टी 20i सामना आहे. सूर्याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 17 पैकी 14 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. तर फक्त 3 वेळाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्याची विजयी टक्केवारी ही 82 इतकी आहे. तसेच सूर्याच्या नेतृत्वात भारताने एकही टी 20i मालिका गमावलेली नाही. त्यामुळे सूर्याकडून या 5 सामन्यांच्या मालिकेतही अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.
टीम इंडियाचा फिल्डिंगचा निर्णय
🚨 Toss News from the Eden Gardens 🚨#TeamIndia have elected to bowl against England in the T20I series opener.
Follow The Match ▶️ https://t.co/4jwTIC5zzs#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/s8VPSM3xfT
— BCCI (@BCCI) January 22, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.