AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बेन स्टोक्सने आधी डिवचलं आणि चूक करण्यास भाग पाडलं, यशस्वी असा अडकला चक्रव्यूहात

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली. पण यशस्वी जयस्वालचं पहिल्या डावात शतक हुकलं. बेन स्टोक्सच्या माईंड गेममध्ये बरोबर फसला.

Video : बेन स्टोक्सने आधी डिवचलं आणि चूक करण्यास भाग पाडलं, यशस्वी असा अडकला चक्रव्यूहात
बेन स्टोक्सने आधी डिवचलं आणि चूक करण्यास भाग पाडलं, यशस्वी असा अडकला चक्रव्यूहातImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 02, 2025 | 9:10 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला. यामुळे भारताच्या वाटेला पहिल्यांदा फलंदाजी आहे. भारताने पहिल्या दिवशीच्या दोन सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. केएल राहुल 2 धावांवर बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि करुण नायर यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 80 धावांची भागीदारी केली. करुण नायर 31 धावांवर असताना ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वालने आक्रमक बाणा कायम ठेवला होता. त्याला रोखणं इंग्लंडसाठी खूपच महत्त्वाचं होतं. कारण त्याचं मैदानात असणं संघासाठी त्रासदायक ठरणार होतं. यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने माईंड गेम खेळला. यशस्वी जयस्वालला आपल्या भावना ताब्यात ठेवणं कठीण होतं. अनेकदा हे चित्र पाहीलं गेलं आहे. स्टोक्सने यशस्वी जयस्वालला डिवचलं आणि बरोबर चक्रव्यूहात अडकवलं.

यशस्वी जयस्वाल मैदानात पाय रोवून व्यवस्थित खेळत होता. त्याचं लक्ष विचलीत करण्यासाठी बेन स्टोक्सने त्याला काहीतरी म्हणाला. भारताच्या डावाच्या 17 व्या षटकात बेन स्टोक्स आणि यशस्वी जयस्वाल यांच्यात शा‍ब्दिक चमकम झाली. बेन स्टोक्स स्वतः गोलंदाजी करत असताना जयस्वालला काहीतरी बोलला. त्यानंतर यशस्वी जयस्वालनेही त्याला उत्तर दिलं.

भारतीय डावाच्या 46 व्या षटकात स्टोक्स त्याच्या प्लानमध्ये यशस्वी झाला. त्याच्या षटकात यशस्वी जयस्वालने नको ती चूक केली. स्टोक्सने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आणि विकेटकिपरच्या हाती झेल गेला. यशस्वीचे शतक हुकले आणि 87 धावा करून तो बाद झाला. शुबमन गिल 107 चेंडूत 13 चौकार मारून 87 धावांवर बाद झाला. त्याचं शतक अवघ्या 13 धावांनी हुकलं.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या डावात भारताने 200 पार धावा केल्या आहेत. शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांची जोडी मैदानात जमली आहे. शुबमन गिलने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने अर्धशतक झळकावत इंग्लंडच्या गोलंदाजांना संकटात आणलं आहे. आता या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.