IND vs ENG 3rd ODI: कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11, जसप्रीत बुमराह बाहेर

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे.

IND vs ENG 3rd ODI: कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकला, अशी आहे Playing 11, जसप्रीत बुमराह बाहेर
IND VS ENG Image Credit source: bcci twitter
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 3:19 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) आजच्या सामन्यात खेळत नाहीय. त्याच्याजागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. मालिकेचा निकाल निश्चित करणारी ही लढत आहे. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड वर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने पलटवार केला. त्यांनी भारताचा 100 धावांनी पराभव केला. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि इंग्लंड दोन्ही टीम्स मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरल्या आहेत.

रीस टॉपलीपासून धोका

पहिलाय वनडेत जसप्रीत बुमराहने 6 विकेट घेतल्या होत्या. दुसऱ्या वनडेत त्याने दोन विकेट काढल्या. दुसऱ्या मॅचमध्ये इंग्लंडकडून रीस टॉपलीने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने 24 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्याने भारताच्या फलंदाजीच कंबरड मोडून टाकलं होतं. मँचेस्टर बद्दल बोलायच झाल्यास, इथे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारतो. या मैदानावर वनडे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 396 धावा केल्या होत्या. या मैदानावर भारताची सर्वाधिक धावसंख्या 336 आहे.

भारताला आक्रमक होण्याची गरज

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघानं नुकत्याच संपलेल्या T20I मालिकेदरम्यान अतिशय आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केलं. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ज्या पद्धतीनं संघाने 247 धावांच्या कमी धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग केला. त्यावरून भारताला बचावाऐवजी आक्रमक होण्याची गरज असल्याचं दिसतंय.

सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा विराट वर

ओल्ड ट्रॅफडवर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. कॅप्टन रोहित शर्मा सातत्याने विराटची पाठराखण करतोय. उद्याच्या सामन्यात विराटची बॅट तळपणं आवश्यक आहे. विराट भारतीय संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या मॅच आधी विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ‘मी पडलो, तर काय? ओह बट माय डार्लिंग, तू उडालास तर काय?’ असा संदेश त्यामध्ये आहे.

भारताची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

इंग्लंडची प्लेइंग 11

जोस बटलर (कॅप्टन), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोइन अली, डेविड विली, क्रेग ओव्हरर्टन, ब्रायडन कार्स, रिसी टॉपली,

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.