Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: विराट कोहली इतिहास घडवण्यासाठी सज्ज, सचिनचा महारेकॉर्ड धोक्यात

Virat Kohli Sachin Tendulkar : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. विराटला या मालिकेत सचिन तेंडुलकर याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

IND vs ENG: विराट कोहली इतिहास घडवण्यासाठी सज्ज, सचिनचा महारेकॉर्ड धोक्यात
virat kohli team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 8:08 AM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पर्थ कसोटीत खणखणीत शतक झळकावत अफलातून सुरुवात केली होती. मात्र विराटला त्याच्या या कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. विराटला बॉर्डर गावसकर ट्रॉफीत धावांसांठी संघर्ष करावा लागला. विराटने त्यानंतर अनेक वर्षांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक केलं. विराट इथेतरी मोठी खेळी करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र विराट इथेही फ्लॉप ठरला. विराट 6 धावा करुन आउट झाला. मात्र विराटला आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची टी 20I मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. विराटला या मालिकेत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा या दोघांनाच 14 हजार धावा पूर्ण करता आल्या आहेत.

विराटला वेगवान 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करत सचिनचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. विराटच्या नावावर सद्यस्थितीत 295 एकदिवसीय सामन्यांमधील 283 डावांमध्ये 13 हजार 906 धावांची नोंद आहे.त्यामुळे विराटला आणखी 94 धावांची गरज आहे. त्यामुळे विराटने 3 सामन्यांमध्ये 94 धावा केल्या तर तो वेगवान 14 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.

हे सुद्धा वाचा

सचिनने 350 तर संगकारा याने 378 डावांमध्ये 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण केल्या होत्या. तसेच विराटने याआधी वनडेत 10 आणि 11 हजार धावांचा टप्पा सर्वात वेगवान पद्धतीने गाठला होता. त्यामुळे आता विराट या मालिकेत वेगवान 14 हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्याची कामगिरी करतो का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).

'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा
'..तरच देशमुखांना न्याय', दमानियांनी पुन्हा मागितला मुंडेंचा राजीनामा.
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट
शिवराय अग्र्यातून कसे सुटले? लाल किल्ल्यावरून EXCLUSIVE रिपोर्ट.
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का
पोलीसच सुरक्षित नाही...4 मद्यपींकडून बेदम मारहाण,CCTV पाहून बसेल धक्का.
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा
'शिंदे CM नकोत, ही शरद पवारांची भूमिका..', राऊतांचा खळबळजक दावा.
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”
विकी कौशलची रायगडावर गर्जना; म्हणाला, “हम शोर नहीं करते, सीधा...”.
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली
राहुल गांधींनी अक्कल पाजळली, जयंतीच्या दिवशी शिवरायांना श्रद्धांजली.
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल
बॉसने तर ट्रॅपमध्ये नाही ना अडकवलं? राऊतांचा सुरेश धसांना खोचक सवाल.
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?
'त्या' नासक्या मंत्र्यांचं नाव घेऊ नका, मनोज जरांगेंचा रोख कोणावर?.
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे
'कमाल'चा खोटापीडिया... आक्षेपार्ह मजकूर शेअर करत तोडले अकलेचे तारे.
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?
'तानाजी सावंतांचं पोरंग सापडतं मग खुनी...', सुप्रिया सुळे का भडकल्या?.