Team India | टीम इंडियासाठी वाईट बातमी, कॅप्टन रोहितचंही टेन्शन वाढलं

Indian Cricket Team | आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने बीसीसीआयने नियोजनाला सुरुवात केलीय. त्यानुसार अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कॅप्टन रोहित शर्माचं कमबॅक झालंय. मात्र त्यात आता एक वाईट बातमी समोर आलीय.

Team India | टीम इंडियासाठी वाईट बातमी, कॅप्टन रोहितचंही टेन्शन वाढलं
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 3:52 PM

मुंबई | बीसीसीआय निवड समितीने रविवारी 7 जानेवारी रोजी अफगाणिस्तान विरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. त्यानुसार, टीममध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी जोडीचं 14 महिन्यांनी कमबॅक झालं. रोहित शर्मा अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा परतल्याने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. मात्र रोहितला पुन्हा एकदा कॅप्टन्सीची सूत्र मिळून 24 तास होत नाहीत, तेवढ्यात एक वाईट बातमी समोर आली आहे.

टीम इंडिया 11 ते 17 जानेवारी दरम्यान अफगाणिस्तान विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र त्याआधीच टीम इंडियाचं पर्यायाने कॅप्टन रोहितचं टेन्शन वाढलंय.

हे सुद्धा वाचा

नक्की काय झालंय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना मुकू शकतो. शमीला झालेली दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. शमीला याच दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळता आलं नव्हतं.

शमीला घोट्याची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो टीम इंडियापासून दूर आहे. आता शमी तिसऱ्या टेस्टमधून टीम इंडियात कमबॅक केलं तर टीम इंडियासाठी तो मोठा दिलासा असेल. किंवा शमीला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावं लागलं तर तो टीम इंडियासाठीही मोठा झटका असेल. त्यामुळे शमीच्या दुखापतीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

टीम इंडियाची अखेरची मालिका

दरम्यान इंग्लंड विरुद्ध असलेली टेस्ट सीरिज ही टीम इंडियाची अखेरची मालिका असेल. कारण त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमाला सुरुवात होईल. हा 17 मोसम जवळपास मार्च ते मे दरम्यान असेल. त्यानंतर 1 जून 2024 पासून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ही टीम इंडियासाठी एकूणच अखेरची मालिका असणार आहे.

टीम इंडियाच्या डोक्याला शॉट

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 25 ते 29 जानेवारी, हैदराबाद.

दुसरा सामना, 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम.

तिसरा सामना, 15 ते 19 फेब्रुवारी, राजकोट.

चौथा सामना, 23 ते 27 फेब्रुवारी, रांची

पाचवा सामना, 7 ते 11 मार्च, धर्मशाला.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.