AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी भारताला धक्का! उपकर्णधाराने केला मोठा खुलासा

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिकेला 28 जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. तर इंग्लंड कर्णधार नॅट सेव्हियर ब्रंटच्या कर्णधाराखाली खेळणार आहे. असं असताना एक मोठी अपडेट समोर आली आहे.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी भारताला धक्का! उपकर्णधाराने केला मोठा खुलासा
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी भारताला धक्का! उपकर्णधाराने केला मोठा खुलासाImage Credit source: PTI
| Updated on: Jun 28, 2025 | 4:02 PM
Share

भारतीय पुरुष, महिला आणि अंडर 19 संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिका खेळत आहे. तर अंडर 19 संघाची वनडे मालिका सुरु आहे. 28 जूनपासून भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. कारण कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी पडली आहे. याबाबतची माहिती उपकर्णधार स्मृती मंधाना हीने दिली आहे. स्मृती मंधानाने सांगितलं की, हरमनप्रीत कौरची तब्येत ठीक नाही. त्यामुळे ती पत्रकार परिषदेला येऊ शकली नाही. त्यामुळे पहिल्या टी20 सामन्यात खेळणार की नाही अशी चिंता क्रीडाप्रेमींना सतावत आहे. पण या बाबतचं स्पष्टीकरण उपकर्णधार स्मृती मंधाना हीने पत्रकार परिषदेत दिलं आणि क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.

स्मृती मंधानाने सांगितलं की, कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यात खेळणार आहे. फक्त तिला आज अस्वस्थ वाटत आहे. मी फक्त तिच्या जागी आली आहे. आम्ही येथे आधीच आलो असून आठ दिवसांपासून तयारी सुरु आहे. काही चांगले सराव सामने खेळलो. यात आम्ही इंग्लंडच्या परिस्थितीचा अंदाज घेतला. संघातील काही खेळाडूंचा हा पहिला इंग्लंड दौरा आहे. त्यामुळे लवकरणं येऊन सराव करणं महत्त्वाचं होतं. त्यांनी या वातावरणाची सवय झाली असून तयारी चांगली सुरु आहे.

‘पुढच्या वर्षी ब्रिटेनमध्ये टी20 वर्ल्डकप होणार आहे. यावेळी परिस्थिती काहीशी अशीच असणार आहे. मला विश्वास आहे की पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत मुली चांगली कामगिरी करतील.’, असंही स्मृती मंधानाने पुढे सांगितलं. पुढच्या वर्षी जून 12 ते जुलै 5 या कालावधीत महिला टी20 वर्ल्डकप होणार आहे.

टी20 मालिकेसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रिग्ज, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, अमनजोत कौर, दीप्ति शर्मा, हरलीन देओल, सयाली सातघरे, स्नेह राणा, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, अरुंधति रेड्डी, क्रांति गौड़, राधा यादव, श्री चरणी.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.