AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी विजय मिळवताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. मात्र भारताचं मोठं नुकसान झालं आहे.

श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका
श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे WTC 2027 गुणतालिकेत अशी झाली उलथापालथ, भारताला बसला फटका
| Updated on: Jun 28, 2025 | 2:45 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आता नऊ संघांमध्ये चुरस सुरु झाली आहे. प्रत्येक कसोटी सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश हे संघ कसोटी सामने खेळले आहेत. त्या सहा संघांमध्या कसोटीच्या चार सामन्यानंतर उलथपालथ झाली आहे. पहिला कसोटी सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. हा सामना ड्रा झाला होता. तर इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केल. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला, तर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहेत. तर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून तिसरं स्थान पटकावलं आहे. तर बांग्लादेश चौथ्या स्थानी असून वेस्ट इंडिज आणि भारताची पिछेहाट झाली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला असून 12 गुणांसह विजयी टक्केवारी ही 100 टक्के आहे. तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आणि एक ड्रॉ झाला. त्यामुळे 16 गुणांसह 66.67 विजयी टक्केवारी आहे. बांगलादेशने एक सामना गमावला आणि एक ड्रॉ झाला म्हणून 4 गुणांसह विजयी टक्केवारी 16.67 टक्के आहे. तर वेस्ट इंडिज आणि भारताने पहिला कसोटी सामना गमावल्याने गुण आणि विजयी टक्केवारी ही शून्य आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना आता पुढच्या सामन्यात कमबॅक करावं लागणार आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर गुणतालिकेत तिसरं स्थान गाठू शकतो. भारत आणि इंग्लंडची विजयी टक्केवारी 50 टक्के असेल. दोन्ही संघांची गुणही 12 असतील. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. तर त्यांचीही विजयी टक्केवारी 50 आणि गुण 12 असतील. दरम्यान असं काही घडलं तर श्रीलंकेला फायदा होईल. श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानी पोहोचेल. पण यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना पुढचे सामने जिंकावे लागतील.

Follow Us
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर
अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange VS Chandrashekhar Bawankule | अजूनही वेळ गेलेली नाही! जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; बावनकुळेंवरही जोरदार हल्लाबोल
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांचे खासदार पंतप्रधानांना भेटण्याआधीच बड्या नेत्याचं सूचक विधान, म्हणाले...
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी
मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट समोर! मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्तींची अचानक बदली, नेमकं काय घडलं?
आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा! आमची सत्ता आली तर पक्ष कसे फुटतात ते अमित शाहांना दाखवू
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक
MNS Meeting | राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये! नाशिक-रायगड दौऱ्यानंतर आज मुंबईत मोठी बैठक; मनसेत मोठे फेरबदल होणार?
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाले, शुद्ध....
भर मंचावर भाजपच्या बड्या नेत्याची जीभ घसरली; थेट म्हणाला, शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या...