AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : श्रीलंकेने बांगलादेशला पराभूत करत मालिका घातली खिशात, असा झाला दुसरा सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील श्रीलंकेने पहिला मालिका विजय मिळवला आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला 1-0 ने मात दिली आहे. दुसऱ्या सामन्यात चौथ्या दिवशीच एक डाव आणि 78 धावांनी विजय मिळवला.

SL vs BAN : श्रीलंकेने बांगलादेशला पराभूत करत मालिका घातली खिशात, असा झाला दुसरा सामना
SL vs BAN : श्रीलंकेने बांगलादेशला पराभूत करत मालिका घातली खिशात, असा झाला दुसरा सामना Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jun 28, 2025 | 2:09 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच मालिकेत श्रीलंका बांगलादेशवर वरचढ ठरली आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने खिशात घातली आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. कारण पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे या सामन्यात काही खास करता आलं नाही. संपूर्ण संघ 247 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर श्रीलंकेने पहिल्या डावात 458 धावांची मोठी खेळी केली. पहिल्याच डावात 211 धावांची आघाडी असल्याने बांगलादेशचा पराभव निश्चित झाला होता. बांगलादेशची आघाडी मोडून काढताना दमछाक झाली. बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 133 धावांवर बाद झाला. श्रीलंकेने हा सामना एक डाव आणि 78 धावांची जिंकला. या विजयासह श्रीलंकेने मालिका 1-0 ने जिंकली. या विजयासह श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फायदा झाला आहे. विजयी टक्केवारी 66.67 टक्के झाली असून तिसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा याने सांगितलं की, ‘दोन्ही सामन्यांमध्ये फरक होता. गोलंदाज आणि फलंदाजांनी येथे कामगिरी केली. गोलंदाजांकडे त्यांच्या योजना होत्या आणि त्यांनी त्या योजना अंमलात आणल्या. हे आमच्यासाठी मनोबल वाढवणारे आहे, आम्ही विरोधी संघावर दबाव आणण्यात यशस्वी झालो. दिनुशाने गोलंदाजीत महत्त्वाचं यश मिळवून दिलं. जेव्हा तुमच्याकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ असते तेव्हा हे एक चांगले लक्षण आहे. निस्संका तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि मला आशा आहे की तो असेच करत राहील.’

बांगलादेशचा कर्णधार नजमुल शांतो म्हणाला की, ‘आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ते खूप निराशाजनक होते. या कसोटीत आम्ही चांगले खेळलो नाही, त्यामुळे खूप निराश झालो. पहिल्या डावात आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती अपेक्षा पूर्ण नव्हती, त्यामुळे आम्हाला सामना गमवावा लागला. मला अजूनही वाटते की आम्हाला प्रथम फलंदाजी करायला हवी होती. आम्ही ज्या पद्धतीने बाद झालो ते पुरेसे नव्हते. पहिल्या डावात आमच्या फलंदाजीमध्ये आम्ही खूप चुका केल्या. तिसऱ्या दिवशी आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते अशा परिस्थितीत पाहून छान वाटले. मला आशा आहे की ते खेळाडू पुढे चांगले करतील.’

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा