AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझा मित्र मुलगी पळवून घेऊन गेलाय, कुठे आहे सांग? म्हणत तरुणाला जबर मारहाण; संभाजीनगरात खळबळ

अल्पवयीन मुलीच्या शोधाच्या नावाखाली एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप नारायण गिधाने यांनी वीरगाव पोलिसांवर केला आहे. शरीरावर मारहाणीचे वळ स्पष्ट दिसत असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत, ज्यामुळे हे प्रकरण चिघळले आहे.

तुझा मित्र मुलगी पळवून घेऊन गेलाय, कुठे आहे सांग? म्हणत तरुणाला जबर मारहाण; संभाजीनगरात खळबळ
तरूणाचे पोलिसांवर गंभीर आरोप
| Updated on: Aug 10, 2026 | 1:14 PM
Share

पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात. सर्वसामान्यांच्या रक्षणाची, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्यावर असते. पण त्या पोलिसांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तर ? असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे घडला आहे. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेला आहे, तो कुठे आहे सांग,” असं म्हणत पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याला मारहाण केली, असा दावा एका तरूणाने केला आहे. आधी पोलिसांनी आपल्याला चौकशीसासाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. मात्र नंतर तिथे मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप नारायण गिधाने याने केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याचा दावा त्याने केला असून त्याच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

त्या तरूणाच्या अंगावर, पाठीवर मारहाणीचे वळ असून, त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या त्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गिधाने याने केली आहे. मात्र तरूणाला कोणत्याही प्रकारे मारहाण केली नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील माळी सागज गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आणि सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर वीरगाव पोलिसांनी चक्र फिरवत त्या बेपत्ता मुलीच्या शोधार्थ तपास सुरू केला. याच तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी नारायण गिधाने यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं.

पोलीस स्टेशनमध्ये गेलो अन्..

त्यानुसार गिधाने पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यावेळी चौकशीदरम्यान पोलिसांनी गिधाने याच्याकडे, त्याच्या मित्राबाबत विचारणा केली. “तुझा मित्र मुलीला पळवून घेऊन गेला आहे, तो कुठे आहे?” असा सवाल करत पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केली, असा गंभीर आरोप गिधाने यांनी केला. एवढंच नव्हे तर, याच चौकशीदरम्यान रवींद्र फाळके यांच्याबाबतही पोलिसांनी आपल्याला प्रश्न विचारल्याचा दावा गिधाने यांनी केला.

या मारहाणीमुळे गिधाने यांच्या पाठीवर अनेक वळ उठले, त्यांची प्रकृतीही खालावली. त्यामुळे गिधाने यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चौकशीच्या नावाखाली पोलिसांकडून आपल्याला अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली आली. त्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतापलेल्या गिधाने यांनी केली.

पोलिसांनी फेटाळले आरोप

दरम्यान, या तरुणाने केलेले सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही त्या तरुणाला केवळ चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. पण त्याला कोणीही मारहाण केलेली नाही, हातही लावलेला नाही, असं वीरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप भिवसने यांनी सांगितलं. पोलिसांनी हे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा