IND vs IRE : जसप्रीत बुमराहचा हा खतरनाक चेंडू पाहा, नक्कीच पाकिस्तानच्या बाबरला येईल टेन्शन, VIDEO
IND vs IRE : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नॅसो काऊंटी स्टेडियमवर होणार आहे. भारत-आयर्लंडमध्ये ज्या पीचवर सामना झाला, तिथेच ही मॅच होणार आहे. जसप्रीत बुमराहसह भारतीय पेसर्सची जबरदस्त गोलंदाजी पाहून पाकिस्तानी फलंदाज नक्कीच टेन्शनमध्ये असतील.

गोलंदाजीमध्ये जसप्रती बुमराह टीम इंडियाच मुख्य अस्त्र आहे. जसप्रीत बुमराहची गोलंदाजी खेळण सोपं नाही. बुमराहची गोलंदाजी खेळताना प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांचा कस लागतो. जसप्रीत बुमराहचे काही चेंडू प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजाच्या मनात धडकी भरवतात. मागच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप आणि आयपीएल 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजीच प्रदर्शन केलं होतं. आता सुरु झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्येही हाच सिलसिला कायम आहे. न्यू यॉर्कच्या नॅसो काऊंटी क्रिकेट स्टेडियममध्ये आयर्लंड विरुद्ध टीम इंडियाचा सामना झाला. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या पेस डिपार्टमेंटकडून ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती, तशीच गोलंदाजी पहायला मिळाली. खासकरुन बुमराहच एक चेंडू असा होता, ज्याने आयर्लंडला ट्रिपल झटका दिला. 9 जूनला होणाऱ्या सामन्याआधी पाकिस्तानला सुद्धा टेन्शन आलं असेल.
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया 5 जून रोजी आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. टीम इंडियाची पहिली गोलंदाजी होती. भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीचा पूर्णपणे फायदा उचलला. या पीचबद्दल जो अंदाज वर्तवण्यात आला होता, तसच पहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय गोलंदाजांनी आपली दाहकता दाखवून दिली. बुमराह यामध्ये मागे नव्हता. त्याने 3 ओव्हरमध्ये फक्त 6 रन्स देऊन 2 विकेट काढले.
बाद झाल्यानतंरही वेदना
बुमराहने जे दोन विकेट काढले त्याला तोड नाही. पण पहिला विकेट जो घेतला, तो झटका आयर्लंडला होता पण वॉर्निंग पाकिस्तानला होती. बुमराहचा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू पीचवर इतका उसळला की, आयरिश फलंदाज हॅरी टेक्टरला फार काही करता आलं नाही. टेक्टर डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. पण वेगात आलेला चेंडू इतका उसळला की, चेंडू आधी हाताला लागला. त्यानंतर जोरात हेल्मेटवर आदळला. विराट कोहलीने अगदी सोपा झेल घेतला. चेंडू टेक्टरच्या हाताला इतका जोरात लागला की, बाद झाल्यानतंरही वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.
View this post on Instagram
याच पीचवर पाकिस्तान विरुद्ध सामना
हा असा चेंडू होता, जो कुठल्याही फलंदाजाच्या मनात धडकी भरवेल, अशा पीचवर बॅटिंग करण्याआधी फलंदाज विचार करेल. खासकरुन समोर जसप्रीत बुमराहसारखा गोलंदाज असेल, तर. 9 जूनला याच मैदानावर याच पीचवर पाकिस्तान विरुद्ध सामना आहे. पाकिस्तानी टीमचे ओपनर मोहम्मद रिजवान आणि बाबर आजमने हा चेंडू पाहिला असेल, तर त्यांना धडकी भरेल. कारण दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीयत.
