AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NED: हाफ सेंच्युरी झळकवूनही Rohit Sharma खूश नाही, सांगितली मनातली गोष्ट

IND vs NED: रोहित शर्मा स्वत:च्याच खेळावर का खूश नाही?

IND vs NED: हाफ सेंच्युरी झळकवूनही Rohit Sharma खूश नाही, सांगितली मनातली गोष्ट
Rohit-Virat
| Updated on: Oct 27, 2022 | 7:40 PM
Share

सिडनी: टीम इंडियाने आज वर्ल्ड कपमधल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवर 56 धावांनी विजय मिळवला. याआधी मागच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली होती. भारताचा कॅप्टन रोहित शर्मा आजच्या सामन्यात कॅप्टन इनिंग खेळला. त्याने 39 चेंडूत 53 धावा फटकावल्या. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर गुरुवारी हा सामना झाला.

रोहित फार खूश नाही

रोहित शर्माने सलामीच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात निराश केलं होतं. पण आजच्या नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा चांगल्या टचमध्ये दिसला. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. सामन्यानंतर रोहितने हाफ सेंच्युरी झळकवण्यावर फार खूश नसल्याचं सांगितलं. पण केलेल्या धावा महत्त्वाच्या होत्या, हे त्यानं मान्य केलं.

शेवटी आत्मविश्वास असणं महत्त्वाच

“माझ्या फिफ्टीवर मी फार आनंदी नाहीय. पण धावा होणं जास्त महत्त्वाच आहे. मग त्या धावा चांगल्या वाटू दे किंवा खराब. दिवसाच्या शेवटी आत्मविश्वास असणं महत्त्वाच आहे” असे रोहित शर्मा म्हणाला.

प्रतिस्पर्ध्याची चिंता करत नाही

नेदरलँड विरुद्ध मिळवलेला विजय जवळपास परफेक्ट आहे, असं रोहित म्हणाला. “नेदरलँडची टीम सुपर 12 साठी पात्र ठरली, त्याचं श्रेय त्यांना जातं. आम्ही नेहमी स्वत: काय करु शकतो, याचा विचार करतो. प्रतिस्पर्ध्याची चिंता करत नाही. प्रामाणिकपणे सांगायच झाल्यास हा परफेक्शनच्या जवळ जाणारा विजय आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.

आणखी दोघांनी अर्धशतकं झळकावली

टीम इंडियाकडून आजच्या मॅचमध्ये विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी सुद्धा अर्धशतकं झळकावली. विराटने 44 चेंडूत नाबाद 62 आणि सूर्यकुमारने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. टीम इंडियाने विजयासाठी 180 धावांच लक्ष्य दिलं होतं. नेदरलँडने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावा केल्या. टीम इंडियाने 56 धावांनी विजय मिळवला.

इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.