IND vs NZ 1st ODI – हार्दिकसोबत झालेल्या अन्यायाचा इशानने घेतला बदला, किवी कॅप्टनला शिकवला धडा VIDEO

IND vs NZ 1st ODI - टीम इंडियाचा ऑलराऊडंर हार्दिक पंड्या या वादग्रस्त निर्णयाला बळी पडला. थर्ड अंपायरशिवाय न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम या वादग्रस्त निर्णयाच्या केंद्रस्थानी होता.

IND vs NZ 1st ODI - हार्दिकसोबत झालेल्या अन्यायाचा इशानने घेतला बदला, किवी कॅप्टनला शिकवला धडा VIDEO
Ishan kishan Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 8:14 AM

IND vs NZ 1st ODI – हैदराबादमध्ये काल टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये शुभमन गिलने केलेल्या द्विशतकी खेळीचीच सर्वत्र चर्चा आहे. शुभमनने हैदराबादच्या मैदानात शानदार, ऐतिहासिक डबल सेंच्युरी झळकवली. शुभमन गिलच्या डबल सेंच्युरी आधी, मैदानात एक वादग्रस्त निर्णय देण्यात आला. या निर्णयाने सर्वांनाच चकीत केलं. टीम इंडियाचा ऑलराऊडंर हार्दिक पंड्या या वादग्रस्त निर्णयाला बळी पडला. थर्ड अंपायरशिवाय न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम या वादग्रस्त निर्णयाच्या केंद्रस्थानी होता. लॅथमने मैदानात जे केलं, त्याचा बदला टीम इंडियाचा विकेटकीपर इशान किशनने घेतला. महत्त्वाच म्हणजे त्याच मॅचमध्ये हिशोब चुकता केला.

….म्हणून थर्ड अंपायरची घेतली मदत

हे सुद्धा वाचा

बुधवारी 18 जानेवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये हार्दिक पंड्याच्या बाबतीत थर्ड अंपायरने दिलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच हैराण करुन सोडलं. न्यूझीलंडच्या बॉलरने टाकलेल्या चेंडूवर कट मारण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला. स्टम्पच्या वर असलेल्या बेल्स हलल्या. काही स्पष्ट दिसलं नाही. त्यामुळे थर्ड अंपायरची मदत घेतली.

लॅथमची चूक हार्दिकच नुकसान

थर्ड अंपायरने वेगवेगळ्या अँगलने रिप्ले पाहिला. त्यावेळी चेंडू बेल्स लागल्याच कुठेही स्पष्ट दिसलं नाही. काही अँगल्समध्ये चेंडू विकेटकीपर टॉम लॅथमच्या ग्लोव्हजमध्ये गेला, त्यानंतर त्याच्या ग्लोव्हजमुळे बेल्स हलल्याच दिसत होता. हार्दिक क्रीजच्या बाहेर नव्हता किंवा चेंडू बेल्सला लागला नव्हता. म्हणजे हार्दिक स्टम्पिंग आणि कॅच आऊट झाला नव्हता.

सर्वचजण चकीत झाले

मात्र तरीही थर्ड अंपायरने हार्दिकला बोल्ड दिलं. अंपायरच्या या निर्णयाने सर्वचजण चकीत झाले. खरंतर संशयाचा फायदा बॅट्समनला मिळतो. हार्दिक पंड्या पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर काही वेळाने लॅथमने पुन्हा एकदा आपल्या ग्लोव्हजने बेल्स उडवले.

इशानने शिकवला धडा

लॅथमने दुसऱ्यांदा हीच गोष्ट जाणूनबुजून केली होती. दोनवेळा त्याने ही चूक केली. भारतीय क्रिकेट चाहते आणि टीम इंडियातील खेळाडून ही कृती पटली नव्हती. इशान किशनला हे आवडल नाही. त्याने धडा शिकवण्याचा चंग बांधला. न्यूझीलंडची फलंदाजी सुरु झाली. टॉम लॅथम क्रीजवर आला, त्यावेळी इशान किशनने हीच पद्धत अवलंबली. कुलदीप यादवचा चेंडू टॉम लॅथम बॅकफूटवर जाऊन खेळला. त्यावेळी बेल्स पडल्या. टीम इंडियाने अंपायरकडे अपील केलं. अंपायरने थर्ड अंपायरकडे पाठवलं. रिप्लेमध्ये लॅथम हिट विकेट नसल्याच दिसलं. इशानने बेल्स उडवले होते. रिप्लेमध्ये स्पष्ट झाल्यानंतर लॅथम नाराज झाला. त्याने मान हलवून नाराजीचे संकेत दिले. पण इशानला काही फरक पडला नाही. तो लॅथमकडे बघून हसत होता. सहाजिकच लॅथमला धडा शिकवण्यासाठी इशानने हे सर्व केलं.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.