AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : कर्णधार-उपकर्णधाराचं कमबॅक;विकेटकीपरला डच्चू! पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी?

India vs New Zealand 1st Odi Probable Playing 11 : भारतीय क्रिकेट संघ नववर्षात शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिलावहिला आणि एकदिवसीय सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? जाणून घ्या.

IND vs NZ : कर्णधार-उपकर्णधाराचं कमबॅक;विकेटकीपरला डच्चू! पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग ईलेव्हन कशी?
Shreyas Iyer and Shubman Gill Team IndiaImage Credit source: BCCI/AFP
| Updated on: Jan 09, 2026 | 11:19 PM
Share

टीम इंडियाने 2025 वर्ष गाजवलं. टीम इंडियाने 2025 वर्षातील शेवटच्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. भारताने यासह 2025 चा गोड शेवट केला. त्यानंतर आता टीम इंडिया 2026 या वर्षात पहिली आंतरराष्ट्रीय मालिका मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात 3 वनडे आणि 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारतीय चाहत्यांचं रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीच्या कमबॅककडे लक्ष असणार आहे. या पहिल्या सामन्यानिमित्ताने भारताची पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लइंग ईलेव्हन कशी असणार? हे जाणून घेऊयात.

कर्णधार-उपकर्णधाराचं कमबॅक निश्चित!

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचं प्लेइंग ईलेव्हनध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. दोघांना दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झालेली. तर शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापतीने घेरलं होतं.

शुबमन-श्रेयसच्या कमबॅकमुळे टॉप 4 चं गणित सोपं झालंय. रोहित आणि शुबमन ही जोडी ओपनिंग करेल. विराट कोहली याच्यावर नेहमीप्रमाणे तिसऱ्या स्थानी खेळण्याची जबाबदारी असेल. तर श्रेयस चौथ्या स्थानी खेळण्यासाठी सज्ज आहे.

विकेटकीपर ऋषभचा पत्ता कट!

टीम मॅनेजमेंटडून गेल्या काही सामन्यांपासून विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत ऐवजी केएल राहुल याला संधी दिली जात आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धही केएललाच संधी मिळाल्यास पंतला पुन्हा एकदा बाहेर बसावं लागेल. केएलला संधी मिळाल्यास तो पाचव्या स्थानी खेळेल. हार्दिक पंड्या याच्या अनुपस्थितीत ऑलराउंडर रवींद्र जडेजा त्याची जागा घेऊ शकतो. तसेच नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

मियाँ मॅजिक परतणार?

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सिराजला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता सिराजला अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा या दोघांपैकी कुणाची साथ मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच कुलदीप यादव याच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.

Follow Us
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ
...तर मुख्यमंत्र्यांनाही माफी मागावी लागेल, महिला आरक्षणाबाबत संजय राऊ.
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.