AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : श्रेयसला मोठी संधी, एकाच झटक्यात रोहित, विराटसह सचिनला पछाडणार?

India vs New Zealand Odi Series 2026 Shreyas Iyer : श्रेयस अय्यर याने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 49 धावा केल्या. त्यानंतर श्रेयसला दुसऱ्या सामन्यात 34 धावा करुन महारेकॉर्ड करण्याची संधी आहे.

IND vs NZ : श्रेयसला मोठी संधी, एकाच झटक्यात रोहित, विराटसह सचिनला पछाडणार?
Shreyas Iyer Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 13, 2026 | 5:51 PM
Share

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुखापतीनंतर नववर्षात मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेतून (India vs New Zealand Odi Series 2026) पुनरागमन केलं. श्रेयसने बडोद्यात पहिल्या सामन्यात 301 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी 49 धावांची निर्णायक खेळी केली. श्रेयसचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकलं. मात्र श्रेयसने तो पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज असल्याचं जाहीर केलं. भारताने पहिला सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता उभयसंघातील दुसरा सामना 14 जानेवारीला होणार आहे. श्रेयसला या सामन्यात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.

श्रेयस महारेकॉर्डसाठी सज्ज

श्रेयससाठी बुधवारी होणारा दुसरा एकदिवसीय सामना खास ठरणार आहे. श्रेयसला राजकोटमध्ये होणाऱ्या सामन्यात इतिहास घडवण्याची संधी आहे. श्रेयस एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. श्रेयसला त्यासाठी अवघ्या 34 धावांची गरज आहे. श्रेयसने दुसऱ्या सामन्यात 34 रन्स करताच तो भारतासाठी वेगवान 3 हजार एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच श्रेयस यासह रोहित शर्मा, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकेल.

श्रेयसची एकदिवसीय कारकीर्द

श्रेयसने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील 68 डावांत 2 हजार 966 धावा केल्या आहेत. श्रेयस 34 धावा करताच त्याच्या 69 डावात 3 हजार धावा पूर्ण होतील. श्रेयस यासह भारताकडून कमी डावात 3 हजार एकदिवसीय धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या भारतासाठी वेगवान 3 हजार धावांचा विक्रम माजी फलंदाज गब्बर अर्थात शिखर धवन याच्या नावावर आहे. धवनने 72 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर विराट दुसऱ्या तर सचिन तिसर्‍या स्थानी विराजमान आहे.

वेगवान 3 हजारी भारतीय फलंदाज

शिखर धवन : 72 सामने

विराट कोहली – 75 सामने

केएल राहुल – 78 सामने

नवजोतसिंह सिद्धू : 79 सामने

सौरव गांगुली : 82 सामने

श्रेयसला व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

तसेच श्रेयस 69 डावांत 3 हजार धावा करताच वेस्ट इंडिजचे महान दिग्गज फलंदाज व्हीव्हीयन रिचर्ड्स यांच्या विक्रमाची बरोबरी साधेल. श्रेयस आणि रिचर्ड्स यांच्या पुढे या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला, विंडीजचा शाई होप आणि पाकिस्तानचा शाई होप आहेत.

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.