AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : मॅचनंतर हार्दिक पंड्याच वक्तव्य भारी पडलं, त्याची बिचाऱ्याची गेली नोकरी

Hardik Pandya : आता अहमदाबादमध्ये होणारा तिसरा टी 20 सामना निर्णायक ठरणार आहे. इथे मॅचविन सीरीज विन असं गणित आहे. टीम इंडिया सीरीज जिंकण्याच्या इराद्याने अहमदाबादमध्ये दाखल झालीय.

Hardik Pandya : मॅचनंतर हार्दिक पंड्याच वक्तव्य भारी पडलं, त्याची बिचाऱ्याची गेली नोकरी
Hardik pandyaImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 31, 2023 | 11:36 AM
Share

IND vs NZ 2nd T20 Pitch : सध्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन T20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. दोन्ही टीम्स मालिकेत 1-1 बरोबरीत आहेत. आता अहमदाबादमध्ये होणारा तिसरा टी 20 सामना निर्णायक ठरणार आहे. इथे मॅचविन सीरीज विन असं गणित आहे. टीम इंडिया सीरीज जिंकण्याच्या इराद्याने अहमदाबादमध्ये दाखल झालीय. या सामन्याआधी लखनौमध्ये झालेल्या दुसऱ्या T20 सामन्याच्या पीचवरुन वाद निर्माण झाला. या वादामुळे एकाला आपली नोकरी गमवावी लागली. हार्दिक पंड्याने लखनौच्या विकेटबद्दल नाराजी व्यक्त केली होती. लखनौची विकेट खराब होती, असं हार्दिक सामन्यानंतर म्हणाला होता. T20 सामन्याला ही साजेशी विकेट नव्हती, असं हार्दिक म्हणाला होता. क्यूरेटर आणि ग्राऊंड स्टाफने आधीच पीच बनवला पाहिजे, असा सल्लाही हार्दिकने दिला होता.

एक मोठी अपडेट

हार्दिकच्या वक्तव्यानंतर लखनौच्या पीचवरुन वाद सुरु झाला. त्या संदर्भात एक मोठी अपडेट आहे. पीच क्यूरेटर सुरेंद्र कुमार यांना हटवण्यात आलं आहे. ते आता मेन ग्राऊंडच काम पाहणार नाहीत. त्यांच्याजागी संजीव अग्रवाल आता लखनौचे नवीन पीच क्यूरेटर असतील. IPL साठी इकाना स्टेडियममधील नऊ पीचेस संजीव अग्रवाल यांच्या देखरेखीखाली बनवण्यात येतील.

टीम मॅनेजमेंटने अखेच्या क्षणी काय केलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्यूरेटरने मॅचसाठी दोन प्रकारच्या काळ्या खेळपट्टया एडवान्समध्ये बनवून ठेवल्या होत्या. भारतीय टीम मॅनेजमेंटने शेवटच्या क्षणी लाल पीचची डिमांड केली. त्याला फ्रेश लाल पीच बनवायला सांगितलं. अशा परिस्थितीत जी नवीन खेळपट्टी बनवली, ती चांगल्या दर्जाची विकेट नव्हती. T20 क्रिकेटसाठी ही परफेक्ट विकेट नव्हती.

हार्दिकला टीका करण्याची काय गरज?

आता प्रश्न हा आहे की, मॅनेजमेंटला शॉर्ट नोटीसवर लाल पीच हवा होता. मग कॅप्टन हार्दिक पंड्याला त्या पीचवर टीका करण्याची काय गरज होती? कारण हार्दिकच्या टीकेनंतर पीच क्यूरेटर सुरेंद्र कुमार यांना त्याच्या पदावरुन हटवण्यात आलय.

न्यूझीलंडचा प्लेयर या पीचबद्दल काय म्हणाला?

“आम्ही तक्रार करु शकत नाही. अशा वेगवेगळ्या विकेट्सवर कशा पद्धतीने खेळायच, ते शोधणं खूप रोमांचक आहे. तुम्ही नेहमीच सपाट विकेटवर खेळत राहिलात, तर तुम्हाला तुमच्या कौशल्याची परीक्षा घेता येणार नाही. जगभरातील वेगळ्या प्रकारच्या विकेट्स ही सकारात्मक बाब आहे” असं ब्रेसवेल म्हणाला. टीम इंडियाचा संघर्ष

लखनौच्या पीचवर न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 99 धावा केल्या. या विकेटवर चेंडू खूप टर्न होत होता. टीम इंडियासाठी हे लक्ष्य खूप सोप वाटत होतं. पण असं झालं नाही. टीम इंडियाने सुद्धा विजय मिळवण्यासाठी संघर्ष केला. न्यूझीलंडने टीम इंडियावर दबाव आणण्यासाठी 5 स्पिनर्स वापरले. भारताने एक चेंडू बाकी असताना 6 विकेट राखून विजय मिळवला.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच