IND vs NZ : रोहितच्या निशाण्यावर नववर्षात खास रेकॉर्ड, हिटमॅन न्यूझीलंड विरुद्ध धमाका करणार?

Most Runs in ODI Cricket : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तडाखेदार कामगिरी केली. आता रोहित न्यूझीलंड विरुद्ध एक्शन मोडमध्ये दिसणार आहे.

IND vs NZ : रोहितच्या निशाण्यावर नववर्षात खास रेकॉर्ड, हिटमॅन न्यूझीलंड विरुद्ध धमाका करणार?
Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 05, 2026 | 2:46 AM

टीम इंडियाने 2025 वर्ष गाजवलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकून 2025 वर्ष आपल्या नावावर केलं. त्यानंतर आता नववर्ष सुरु झालं आहे. टीम इंडिया 2026 मधील पहिला आणि एकदिवसीय मालिका मायदेशात खेळणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारताच्या अनुभवी जोडीकडून क्रिकेट चाहत्यांचं या मालिकेत धमाकेदार खेळीची आशा आहे. हिटमॅन रोहितला या मालिकेत खास यादीत आणखी पुढे जाण्याची संधी आहे.

11 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेचा थरार

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. रोहितला या मालिकेत एकदिवसीय धावांबाबत दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस आणि पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हक या दोघांना मागे टाकण्यासाठी संधी आहे.

रोहितची एकदिवसीय कारकीर्द

रोहितने एकदिवसीय कारकीर्दीत 279 सामन्यांमधील 271 डावांत 11 हजार 516 धावा केल्या आहेत. रोहितला आता जॅक कॅलिसला एकदिवसीय धावांबाबत मागे टाकण्यासाठी फक्त 64 रन्सची गरज आहे. जॅक कॅलिस याने 328 एकदिवसीय सामन्यांत 11 हजार 579 धावा केल्या आहेत.

इंझमामला मागे टाकण्यासाठी किती धावांची गरज?

रोहितला इंझमामला मागे टाकण्यासाठी 200 पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील. इंझमामला एकदिवसीय धावांबाबत मागे टाकण्यासाठी रोहितला 224 धावांची गरज आहे. अवघ्या 3 सामन्यांत 224 धावा करणं सोपं जरी नसलं तरी ते अवघडही नाही. तसेच रोहितसाठी ते अवघड अजिबात नाही. ही मालिका भारतात होत आहे. रोहितची बॅट तळपली तर तो इंझमामला एकाच खेळीसह पछाडू शकतो. त्यामुळे रोहित या मालिकेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शुबमनचं कमबॅक, श्रेयस खेळणार की नाही?

दरम्यान न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून भारतीय संघात प्रमुख खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. कर्णधार शुबमनल गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या दोघांचं दुखापतीनंतर कमबॅक झालं आहे. शुबमन पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचं निश्चित आहे. मात्र श्रेयस खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. श्रेयसला या मालिकेत खेळण्याआधी फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. श्रेयस या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला तरच त्याला या मालिकेत खेळता येईल. त्यामुळे श्रेयसच्या फिटनेसबाबत काय अपडेट येते, याचीही चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे.