AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Asia Cup 2022: एकदम दणदणीत… विराटने उलट्या हाताने मारला रिव्हर्स स्वीप, VIDEO एकदा बघाच

IND vs PAK Asia Cup 2022: क्रिकेट रसिकांना एका उत्कंठावर्धक सामन्याची अपेक्षा आहे. या दरम्यान क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या (Virat kohli) फॉर्मकडेही विशेष लक्ष असणार आहे.

IND vs PAK Asia Cup 2022:  एकदम दणदणीत... विराटने उलट्या हाताने मारला रिव्हर्स स्वीप, VIDEO एकदा बघाच
Virat-kohliImage Credit source: twitter
| Updated on: Aug 28, 2022 | 11:17 AM
Share

मुंबई: भारत-पाकिस्तान (IND vs PAK) मध्ये आज महामुकाबला रंगणार आहे. आशिया कप मध्ये (Asia cup) दोन्ही टीम्स दबाव कसा हाताळतात, कुठला संघ सरस खेळतो, याकडे क्रिकेट जगताचे लक्ष असणार आहे. क्रिकेट रसिकांना एका उत्कंठावर्धक सामन्याची अपेक्षा आहे. या दरम्यान क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या (Virat kohli) फॉर्मकडेही विशेष लक्ष असणार आहे. कारण मागच्या तीन वर्षात विराट कोहलीच्या बॅट मधून एकही शतक निघालेलं नाही. धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही विराट कोहली फ्लॉप ठरला होता. कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये त्याची बॅट चालली नव्हती. त्यानंतर विराटने क्रिकेटपासून महिन्याभराचा ब्रेक घेतला. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्याच्यावेळी विराटला विश्रांती देण्यात आली होती. त्याचा संघात समावेश केला नव्हता.

रोहितकडून विराटची पाठराखण

विराट आज पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. सातत्याने टीकेच सामना करणारा हा खेळाडू आज आपल्या फलंदाजीचा करिष्मा दाखवेल, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे. त्यांचे विराटच्या कामगिरीकडे डोळे लागले आहेत. विराट खराब फॉर्मचा सामना करताना, कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड यांनी त्याची पाठराखण केली.

…तर निवड समिती मागे-पुढे पहाणार नाही

एका मर्यादेपलीकडे विराटला संभाळून घेणं, टीम मॅनेजमेंटलाही शक्य नाहीय. त्यामुळे विराटला आता धावा कराव्याच लागतील. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी तसे संकेत दिले आहेत. विराटने धावा केल्या पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे. एकप्रकारे विराटसाठी हा सूचक इशारा मानला जातोय. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप लक्षात घेता, विराटचं फॉर्म मध्ये परतण आवश्यक आहे. आशिया कप स्पर्धेतील विराटच्या फॉर्मवर निवड समितीच बारीक लक्ष असेल. कारण त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही, तर निवड समिती मोठा निर्णय घ्यायला मागे-पुढे पहाणार नाही. त्यामुळे विराटसाठी आशिया कप महत्त्वाचा आहे.

विराटने दाखवली वेगळी झलक

विराट कोहलीला सुद्धा त्याच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव आहे. तो त्याच्या परीने भरपूर मेहनत घेतोय. कुटुंबासोबत सुट्टीवरुन परतल्यानंतर विराटनेही मैदानात मेहनत घेतली आहे. नेट मधला विराटची बॅटिंग पाहिल्यानंतर त्याला लवकरच सूर गवसेल असं दिसतय. भारतीय संघ सध्या दुबईत नेट्स मध्ये सराव करतोय. यावेळी विराटच्या बॅट मधून एक वेगळा फटका पहायला मिळाला. विराट सहसा आडवी बॅटिंग करत नाही. पण विराटने नेटमध्ये चहलच्या गोलंदाजीवर उलट्या हाताने कडक रिव्हर्स स्वीपचा शॉट मारला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.