AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK, Video : पाकिस्तानच्या विकेटकीपरने पायाने पकडला झेल, भारताच्या आदर्श सिंहला परतावं लागलं तंबूत

दुबईत अंडर १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धा खेळली जात आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. हा सामना पाकिस्तानने जिंकला.पण या सामन्यातील एक झेल चर्चेचा विषय ठरला. विकेटकीपरने पायाने झेल घेतल्याने आदर्श सिंहला तंबूत परतावं लागलं.

IND vs PAK, Video : पाकिस्तानच्या विकेटकीपरने पायाने पकडला झेल, भारताच्या आदर्श सिंहला परतावं लागलं तंबूत
IND vs PAK, Video : पाकिस्तानच्या विकेटकीपरला नशिबाची जोरदार साथ, कॅच सुटल्यातच जमा होता पण पायाने असा पकडला
| Updated on: Dec 11, 2023 | 2:49 PM
Share

मुंबई : 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धा दुबईत खेळली जात आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आले होते. हा सामना पाकिस्तानने जिंकला आणि भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमवून २५९ धावा केल्या होत्या. विजयासाठी २६० धावांचं आव्हान दिलं होतं. पण या धावा भारतीय गोलंदाजांना रोखता आल्या नाहीत. भारताला ८ गडी राखून पाकिस्तानने पराभूत केलं. भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली. पण ही व्यर्थ गेली असंच म्हणावं लागेल. या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करत असताना विचित्र प्रकार घडला. आदर्श सिंह दुर्दैव म्हणा की विकेटकीपर साद बेगचं नशिब यापैकी काही एक म्हणू शकता. कारण विकेटकीपर साद बेगनं हाताने नाही तर पायाने झेल पकडला आणि आदर्श सिंहला तंबूचा रस्ता दाखवला.

भारतीय संघ फलंदाजी करताना ३२ वं षटक सुरु होतं. हे षटक अराफत मिन्हास टाकत होता. यावेळी मैदानात उदय शरण आणि आदर्श सिंह यांची जोडी जमली होती. ही जोडी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली होती. पण अराफतने विकेटकीपर सादच्या मदतीने ही जोडी फोडली. अराफतने स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला. डावखुऱ्या आदर्श सिंह स्विपच्या प्रयत्नात गेला. पण चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि कट लागून विकेटकीपरच्या दिशेने गेला. चेंडू ग्लोव्ह्जला लागून खाली पडणार तितक्यात त्याने हा चेंडू पायामध्ये पकडला. चेंडू आरामात बसल्याने गोलंदाजाने लागलीच अपील केली आणि पंचांनी त्याला बाद दिलं.

भारताकडून आदर्श सिंहने ६२, उदय शरणने ६० आणि सचिन दासने ५८ धावांची खेळी केली. पण या तिन्ही अर्धशतकी खेळींवर अजान आवेसचं एक शतक भारी पडला. त्याने १३० चेंडूत १०५ धावा केल्या. यात १० चौकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, शाजैब खान याने ६३ धावा केल्या. त्यात कर्णधार साद बेगने अर्धशतक ठोकलं. नाबाद ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. पाकिस्तानने ४७ षटकात २ गडी गमवून हे लक्ष गाठलं.

सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.