
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत आयर्लंडला पराभूत करत विजयी सुरुवात केली. मात्र रोहितच्या मागे सलामीच्या सामन्यापासून मागे लागलेलं दुखापतीचं ग्रहण अजून कायम आहे. रोहितला आयर्लंड विरुद्ध बॅटिंग दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला मैदान सोडावं लागलं होतं. रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर आता टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील दुसरा सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना रविवारी 9 जून रोजी होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्माने नेट्समध्ये बॅटिंगचा सराव करत होता. रोहितला या सरावादरम्यान दुखापत झाल्याचा दावा केला जात आहे. रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. रोहितला दुखापत झाल्यानंतर नेट्समधील सर्व सहकारी एकवटले आणि विचारपूस करु लागले. काही वेळ सरावात खंड पडला. रोहितच्या या दुखापतीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. रोहितला नक्की काय झालं? सरावादरम्यान नक्की काय घडलं? हे जाणून घेऊयात.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार,रोहित शर्मा शुक्रवारी नेट्स प्रॅक्टिस करत होता. रोहितला या सरावादरम्यान हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर रोहितवर उपस्थित वैद्यकीय पथकाने आवश्यक ते उपचार केले. आता महामुकाबल्याआधी रोहितला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नसावी, अशीच आशा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला आहे. मात्र जर रोहितला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं, तर त्याच्या जागी कुणाचा समावेश केला जाणार? असा प्रश्नही उपस्थित होतो.
रोहितला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागल्यास त्याच्या जागी विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन याला संधी मिळू शकते. संजूला बॅटिंगसह विकेटकीपिंग असा दुहेरी अनुभव आहे. संजूने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता रोहित फिट झाल्यास संधी मिळण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र दुर्देवाने रोहितला बाहेर पडावं लागलं, तर टीम मॅनेजमेंट संजूला संधी देणार का? हा देखील प्रश्नच आहे.
रोहितला दुखापत
Rohit Sharma injured his finger today during practice, just before the India vs. Pakistan match. (Ravish Bisht) pic.twitter.com/xbvZyXBCJX
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) June 8, 2024
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कॅप्टन), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.