AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : 15 डिसेंबरला इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs Pakistan Live Streaming : रविवारी 15 डिसेंबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणरा आहे. जाणून घ्या हा सामना कुठे पाहायला मिळेल?

IND vs PAK : 15 डिसेंबरला इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
india vs pakistan cricket fansImage Credit source: AFP
| Updated on: Dec 14, 2024 | 11:55 PM
Share

क्रिकेट चाहत्यांचं आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेकडे लक्ष लागून आहे. स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनुसार होणार असल्याचं म्हटंल जात आहे. क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याची प्रतिक्षा आहे. साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं हा दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबल्याकडे लक्ष असतं. इंडिया-पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. मात्र सामन्याला अजून फार वेळ आहे. मात्र त्याआधी क्रिकेट चाहत्यांना इंडिया-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा महामुकाबला पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 15 डिसेंबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

अंडर 19 वूमन्स आशिया कप स्पर्धेचं यंदा पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेला रविवार 15 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचं आयोजन हे मलेशियातील क्वालालांपूर येथे करण्यात आलं आहे. या स्पर्धेत टीम इंडियासह एकूण 6 संघ खेळणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि यजमान मलेशिया हे संघ भिडणार आहेत. या 6 संघांना 3-3 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंकेचा समावेश आहे. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ बी ग्रुपमध्ये आहेत.

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत

टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याला 15 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.  तर त्याआधी 11 वाजता टॉस होईल. या स्पर्धेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर सामन्याचा थरार अनुभवता येईल.

अंडर19 आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), जी त्रिशा, कमलिनी जी (विकेटकीपर), भाविका अहिरे (विकेटकीपर), ईश्वरी अवसारे, मिथिला विनोद, जोशीता वीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, केसरी द्रीथी, आयुषी शुक्ला, आनंदिता किशोर, एमडी शबनम आणि नंदना एस.

पाकिस्तान वूमन्स अंडर 19 टीम: जोफिशन अय्याज (कॅप्टन), अरीशा अन्सारी, फिजा फियाज, महम अनीस, रवेल फरहान, कोमल खान, वसीफा हुसैन, अलीसा मुख्तियार, कुरतुलैन, रोजिना अकरम, तैयबा इमदाद, फातिमा खान, हनिया अहमर, महनूर जेब आणि शाहर बानो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.