
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकला होता. तब्बल 20 एकदिवसीय सामन्यानंतर टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. केएलने त्या सामन्यात डाव्या हाताने टॉस उडवला होता. आपणही टी 20I मालिकेत डाव्या हाताने टॉस उडवणार असल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव याने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हटलं होतं. मात्र टीम इंडिया आणि सूर्यकुमार अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नाणेफेकीचा कौल लागला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे कटकमधील बाराबती स्टेडियम इथे करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडियात उपकर्णधार शुबमन गिल आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या या दोघांचं प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक झालं आहे. या दोघांना दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर रहावं लागलं होतं. मात्र आता दोघे परतल्याने टीम इंडियाची ताकद वाढली आहे. तसेच शुबमनच्या कमबॅकमुळे संजू सॅमसन याला डच्चू देण्यात आला आहे. जितेश शर्मा विकेटकीपर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
दरम्यान कटकमधील या मैदानात गेल्या 10 सामन्यांपैकी पहिले बॅटिंग करणाऱ्यांचा 4 वेळा विजय झाला आहे. तर विजयी धावांचा पाठलाग करताना 6 वेळा यश मिळवलं आहे. त्यामुळे आता कटकमधील या सामन्यात टीम इंडिया मात करत विजयी सलामी देणार की दक्षिण आफ्रिका मैदान मारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाला बॅटिंगचं आमंत्रण
🚨 Toss 🚨#TeamIndia have been put into bat first.
Updates ▶️ https://t.co/tiemfwcNPh #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZCl53IqrWK
— BCCI (@BCCI) December 9, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्रक्रम(कॅप्टन), क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी आणि एनरिक नॉर्तजे.