Gautam Gambhir : अर्शदीप सिंह याच्याकडून एका ओव्हरमध्ये 7 Wide, गौतम गंभीरची सटकली, पाहा व्हीडिओ
Gautam Gambhir Angry Reactions On Arshdeep Singh Wide : अर्शदीप भारताचा यशस्वी टी 20i गोलंदाज आहे. मात्र अर्शदीपने एकाच ओव्हरमध्ये 7 वाईड बॉल टाकले. त्यामुळे गंभीर संतापला. पाहा व्हीडिओ.

टीम इंडियाचा टी 20i क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज अशी बिरुदावली मिरवणाऱ्या अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात निराशा केली आहे. अर्शदीप सिंह याने न्यू चंडीगड येथील मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये नकोशी कामगिरी करुन लाज घालवली. अर्शदीप सिंह याने एका ओव्हरमध्ये 6 नाही तर तब्बल 13 बॉल टाकले. कहर म्हणजे अर्शदीप याने एकाच ओव्हरमध्ये तब्बल 7 वाईड बॉल टाकले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला काही न करता 7 धावा मिळाल्या. अर्शदीपला वाईड बॉल टाकताना पाहून डग आऊटमध्ये बसलेल्या हेड कोच गौतम गंभीरचा पारा चढला. सातत्याने वाईड बॉल टाकल्याने गंभीर संतापलेला दिसला. गंभीरच्या या गंभीर भावमुद्रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गौतम गंभीर संतापला
🚨Head Coach Gautam Gambhir’s ANGRY reactions on Arshdeep Singh’s wide.🤯
– Arshdeep give 17 runs in single over..!!🤯pic.twitter.com/BuQclbWgvU
— Sam (@Cricsam01) December 11, 2025
