दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा चौथा टी20 सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयला समजली चूक, आता असा बदल करणार!

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला. पहिल्यांदाच अशा पद्धतीने सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे बीसीसीआयची जगभरात नाचक्की झाली आहे. आता बीसीसीआय ही चूक दुरूस्त करण्यासाठी पावलं उचलणार आहे. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे.

दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा चौथा टी20 सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयला समजली चूक, आता असा बदल करणार!
दक्षिण अफ्रिकेविरूद्धचा चौथा टी20 सामना रद्द झाल्यावर बीसीसीआयला समजली चूक
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 18, 2025 | 5:29 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना रद्द झाल्याने या मालिकेचं स्वरूप बदललं आहे. दक्षिण अफ्रिकेच्या हातून मालिका जिंकण्याची संधी निघून गेली असून बरोबरी साधता येऊ शकते. तर भारताकड मालिका जिंकण्याची नामी संधी आहे. चौथा कसोटी सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाज दाट धुक्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे अटल बिहारी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. आता बीसीसीआयने या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली असून चूक मान्य केली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, येणाऱ्या काळात उत्तर भारतातील हवामानाची स्थिती पाहून स्पर्धा किंवा मालिकांचं वेळापत्रक ठरवण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. राजीव शुक्ला यांनी एएनआयशी बोलताना मान्य केलं की, लखनौ टी20 सामना रद्द झाल्याने क्रीडाप्रेमी नाराज आहेत.

राजीव शुक्ला यांनी पुढे सांगितलं की, बीसीसीआय टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळापत्रकाची समीक्षा करेल. 15 डिसेंबर ते 15 जानेवारी दरम्यान उत्तर भारतात होणारे सामने पश्चिम भारत आयोजित करण्याचा प्रयत्न करेल. उत्तर भारतात थंडीच्या दिवसात दाट धुक्याचं सावट असतं. त्यामुळे दृश्यमानता कमी असते. प्रदूषण हा देखील मोठा मुद्दा आहे. अशा स्थितीत सामने खेळणं कठीण असणार आहे. राजीव शुक्ला म्हणाले की, ‘सामना धुक्यामुळे रद्द करावा लागला. लोकं नाराज होते. आम्हाला 15 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत सामन्यांचं वेळापत्रक ठरवावं लागेल. उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात सामने आयोजित करण्याची चर्चा आहे. देशांतर्गत सामनेही धुक्यामुळे प्रभावित झाले असून हा एक गंभीर मुद्दा आहे.’

चाहत्यांना पूर्ण पैसे मिळणार नाहीत, कारण…

क्रिकेट रसिकांनी टी20 सामना पाहण्यासाठी हजारो रूपये खर्च केले होते. त्यांनी तिकीटं विकत घेतलं होतं. पण त्यांना पूर्ण पैसे मिळणार नाहीत. बुकिंग चार्जचे पैसे कापून उर्वरित पैसे मिळतील. त्यामुळे आता पैसे काढून सामना पाहणं देखील जोखीमेचं असल्याचं दिसत आहे. कारण अशा पद्धतीने सामने रद्द होऊ लागले तर प्रत्यक्ष सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते.