IND vs SA: ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ 9 फोर, 2 SIX, DK च्या बॅटिंगचा VIDEO बघा, तुम्हालाही असंच वाटेल

IND vs SA: दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आज तुफान खेळला. पुन्हा एकदा त्याने जिंकून घेतलं. आजची त्याची बॅटिंग पाहून पुन्हा श्रेयस तळपदेच्या 'कौन हैं प्रविण तांबे' चित्रपटातील ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ हा डायलॉग आठवला.

IND vs SA: ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ 9 फोर, 2 SIX, DK च्या बॅटिंगचा VIDEO बघा, तुम्हालाही असंच वाटेल
dinesh karthik-hardik pandya
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 17, 2022 | 9:14 PM

IND vs SA: दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आज तुफान खेळला. पुन्हा एकदा त्याने जिंकून घेतलं. आजची त्याची बॅटिंग पाहून पुन्हा श्रेयस तळपदेच्या ‘कौन हैं प्रविण तांबे’ चित्रपटातील ‘सर ये एज-वेज में विश्वास नही रखता’ हा डायलॉग आठवला. वयाच्या 36 व्या वर्षी दिनेश कार्तिक एका विशीतल्या तरुणाला लाजवेल असा खेळतोय. आज भारत आणि दक्षिण आफिकेमध्ये (IND vs SA) चौथा टी 20 सामना सुरु आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर ही मॅच सुरु आहे. आज या मैदानावर दिनेश कार्तिकरुपी वादळ पहायला मिळालं. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक फलंदाजीला यायचा तेव्हा मैदानावर DK, DK, DK च्या घोषणा पब्लिक द्यायची. ते प्रेम उगाच नव्हतं, आज दिनेशने पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीतून ‘टायगर अभी जिंदा है’ हे दाखवून दिलं. महत्त्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये मोठा खेळाडू तो असतो, जो संकटसमयी संकटमोचक बनतो. आज दिनेश कार्तिकने भारताचा डाव अडचणीत असताना असा खेळ दाखवला. त्याने नुसतं अर्धशतकच फटकावलं नाही, तर संघाला अडचणीतून बाहेर काढलं.

आज जिंकायचच

भारताला पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय आवश्यक आहे. दिनेश कार्तिक आज फलंदाजीला मैदानाता आला, तेव्हा भारताच्या चार बाद 81 धावा झाल्या होत्या. भारताचा डाव लवकर आटोपतो की, काय अशी स्थिती होती. पहिल्या 10 षटकात भारताच्या तीन बाद 56 धावा होत्या. पण दिनेशने तिथून सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याला उपकर्णधार हार्दिक पंड्याने देखील तितकीच तोलामोलाची साथ दिली. दोघांनी मिळून पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्या आज संकटमोचक ठरले. दिनेश कार्तिकने 27 चेंडूत 55 आणि हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा फटकावल्या. या दोघांच्या बळावर भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 169 धावा केल्या. दिनेश कार्तिक अखेरच्या षटकात प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण तो पर्यंत त्याने संघाला सुस्थितीत पोहोचवल होतं.

दिनेश कार्तिकची अफलातून बॅटिंग इथे क्लिक करुन बघा

दिनेश कार्तिकने घेतला समाचार

कॅप्टन ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड ज्या आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर गडबडले, दिनेश कार्तिकने त्यांचाच समाचार घेतला. पहिल्या 10 ओव्हर्समध्ये हे गोलंदाज जितके भेदक वाटले. नंतरच्या दहा षटकात पंड्या-कार्तिक जोडीने त्यांची तितकीच धुलाई केली. दिनेश कार्तिकने 27 चेंडूतील त्याच्या 55 धावांच्या खेळीत 9 चौकार आणि दोन षटकार खेचले. हार्दिक पंड्याने 31 चेंडूत 46 धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें