AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final: अंतिम सामन्यात भारताच्या नशिबी पुन्हा एकदा ‘पनौती’ पंच! क्रीडाप्रेमींच्या मते ठरतोय अनलकी, कसं ते जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. हा सामना 29 जूनला बारबाडोसमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने पंचांचा पॅनेल जाहीर केला आहे. मात्र यापैकी एका पंचाचं नाव वाचून क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

IND vs SA Final: अंतिम सामन्यात भारताच्या नशिबी पुन्हा एकदा 'पनौती' पंच! क्रीडाप्रेमींच्या मते ठरतोय अनलकी, कसं ते जाणून घ्या
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 28, 2024 | 3:57 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी आता भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने ठाकले आहेत. 29 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरु होईल. दक्षिण अफ्रिका संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर भारतीय संघ दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे या सामन्याआधीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय क्रीडाप्रेमी जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून निकालापर्यंतचे तास ढकलत आहे. असं असताना आयसीसीकडून अंतिम सामन्यासाठी आयसीसीकडून पंचांची घोषणा करण्यात आली आहे. त्या पॅनेलमधील एका पंचाचं नाव वाचून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अंतिम फेरीसाठी रिचर्ड एलिंगवर्थ आणि ख्रिस ग्रॅफनी हे मैदानी पंच असतील. तर रिचर्ड कॅटलबोरो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असेल. तर चौथ्या पंचांची भूमिका रॉडनी टकर यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

रिचर्ड कॅटलबोरो हे नाव भारतीय क्रीडाप्रेमींसाठी गेल्या काही वर्षात ना आवडतं झालं आहे. कारण जेव्हा ते पंच म्हणून बाद फेरीत आले तेव्हा तेव्हा भारतीय संघावर नामुष्की ओढावल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा मिठाचा खडा पडू नये यासाठी क्रीडाप्रेमी आतापासून प्रार्थना करू लागले आहेत. रिचर्ड कॅटलबोरो हा भारतासाठी पनौती असल्याची टीका क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर करत आहेत. वनडे 2023 फायनल, 2019 सेमीफायनल, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 फायनलमध्ये त्यांनी मैदानी पंचाची भूमिका बजावली आहे. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण अफ्रिका : एडेन मार्कराम (कर्णधार) , ओटनील बार्टमन , गेराल्ड कोएत्झी , क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , ब्योर्न फॉर्च्युइन , रीझा हेंड्रिक्स , मार्को जॅन्सेन , हेनरिक क्लासेन , केशव महाराज , डेव्हिड मिलर , ॲनरिक नॉर्टजे , कागिसो रबाडा , सेंट ट्रायब्स्स्टन , ट्रायब्स्स्टन , रियान टॅब्सी.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार) , हार्दिक पंड्या , यशस्वी जयस्वाल , विराट कोहली , सूर्यकुमार यादव , ऋषभ पंत , संजू सॅमसन , शिवम दुबे , रवींद्र जडेजा , अक्षर पटेल , कुलदीप यादव , युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंह , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.