IND vs SA T 20: भारताचा धावांचा डोंगर, इशानने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा

IND vs SA T 20: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिकेतील पहिला T 20 सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs SA T 20: भारताचा धावांचा डोंगर, इशानने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कसं धुतलं ते या VIDEO मध्ये पहा
ishan kishan Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 8:51 PM

मुंबई: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिकेतील पहिला T 20 सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हा निर्णय योग्य ठरवता आला नाही. इशान किशन (Ishan Kishan), ऋषभ पंत, हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने धावांचा विशाल डोंगर उभा केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 211 धावा केल्या आहेत. इशान किशनने आज जबरदस्त फलंदाजी केली. आयपीएलमधील अपयश त्याने इथे धुवून काढलं. त्याने 48 चेंडूत 76 धावा चोपल्या. यात 11 चौकार आणि 3 षटकार होते. इशान आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सलामी दिली. पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात भारताने बिनबाद 51 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच षटकात पर्नेलने दक्षिण आफ्रिकेला पहिलं यश मिळवून दिलं.

इशानने आफ्रिकेच्या गोलंदाजांना कसं चोपलं, ते इथे क्लिक करुन VIDEO पहा

ओव्हरच्या सुरुवातीलाच गायकवाडने षटकार ठोकला होता. पण दुसऱा चेंडू कव्हर्सला मारण्याच्या प्रयत्नात त्याने मिडविकेटला बावुमाकडे सोपा झेल दिला. ऋतुराज गायकवाडने 15 चेंडूत 23 धावा केल्या. यात 3 षटकार होते. पहिल्या 10 षटकात भारताच्या 1 बाद 102 धावा झाल्या होत्या.

इशान बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने धावगती धीमी होऊ दिली नाही. त्याने सुद्धा फटकेबाजी केली. श्रेयसने 27 चेंडूत 36 धावा केल्या. यात एक चौकार आणि 3 षटकार होते. ऋषभ पंतने 16 चेंडूत 29 धावा करताना दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक पंड्याने आयपीएलचा फॉर्म इथेही कायम ठेवला. त्याने व्हाइस कॅप्टनपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने 12 चेंडूत 31 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकार होते.

दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला कोरोना

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम इंडियाच्या आधी कोरोना व्हायरसने झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका टॉप फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. एडन मार्करमचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.