‘आकडे नेहमीच सगळं…’, चांगलं खेळूनही दिग्गज क्रिकेटपटूला इशांतच्या फलंदाजीत खोट दिसली

भारतीय संघाला भले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी 20 सीरीज जिंकता आली नसेल, पण या सीरीजमधून काही खेळाडूंनी कमबॅक जरुर केलं. विकेटकीपर फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) या सीरीजमध्ये दमदार कामगिरी केली.

'आकडे नेहमीच सगळं...', चांगलं खेळूनही दिग्गज क्रिकेटपटूला इशांतच्या फलंदाजीत खोट दिसली
ishan kishan Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 2:55 PM

मुंबई: भारतीय संघाला भले दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी 20 सीरीज जिंकता आली नसेल, पण या सीरीजमधून काही खेळाडूंनी कमबॅक जरुर केलं. विकेटकीपर फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) या सीरीजमध्ये दमदार कामगिरी केली. हार्दिक पंड्याने आपला आयपीएलचा फॉर्म इथेही कायम ठेवला. इशान किशनने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. इशान चांगला खेळला पण गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहरा (Ashish Nehra) मात्र त्याच्या कामगिरीने प्रभावित झालेला नाही. इशान किशन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चारही सामन्यात सलामीला आला होता. त्याने 150.36 च्या स्ट्राइक रेटने 206 धावा केल्या. या दरम्यान पहिल्या टी 20 मध्ये त्याने 76 धावा ठोकल्या. नेहराच्या मते ही काही फार मोठी गोष्ट नाहीय. त्याच्या खेळात अजूनही सुधारणलेला वाव आहे.

आकडे नेहमीच संपूर्ण गोष्ट सांगत नाहीत

“सीरीजमध्ये इशान किशनचे आकडे चांगले आहेत. पण आकडे नेहमीच संपूर्ण गोष्ट सांगत नाहीत. त्याने चांगल्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. इशान किशन ज्या पद्धतीचा खेळाडू आहे, त्याच्यासाठी असा खेळ दाखवणं सोपं आहे. त्याने ज्या धावा केल्यात, त्याचा परिणाम संघावर दिसला पाहिजे” असं आशिष नेहराने सांगितलं. “इशानने दिल्लीमध्ये 76 धावा केल्या. पण खेळताना तो तितका सहज वाटला नाही” असं आशिष नेहरा म्हणाला.

इशानच्या खेळात सुधारणेची गरज

“भारताचा माजी विकेटकीपर फलंदाज पार्थिव पटेलने सुद्धा आशिष नेहराच्या या मताचं समर्थन केलय. इशानने आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये 400 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये त्याने चांगला खेळ दाखवला. पण त्याची बिनधास्त फलंदाजी दिसली नाही” असं पार्थिव म्हणाला. “टीक सहन करुन पुनरागमन करणं, कुठल्याही खेळाडूसाठी सोपं नसतं. त्याने शेवटच्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये दोन षटकार लगावले. तो पुढे चाललाय, ते यातून दिसतं. त्याने या सीरीजमध्ये भले धावा केल्या असतील, पण अजूनही सुधारणेला वाव आहे” असं पार्थिव पटेलने सांगितलं

Non Stop LIVE Update
गोंविदानं दाऊदच्या मदतीने निवडणूक लढविली होती, राम नाईक आरोपांवर ठाम
गोंविदानं दाऊदच्या मदतीने निवडणूक लढविली होती, राम नाईक आरोपांवर ठाम.
भाजपात आल्यावर चाकूरकरांची स्नूषा अर्चना पाटील यांची प्रतिक्रीया
भाजपात आल्यावर चाकूरकरांची स्नूषा अर्चना पाटील यांची प्रतिक्रीया.
रावणाच्या अहंकाराचा नाश झाला, तुम्ही कोण ? निलेश लंके यांचा थेट हल्ला
रावणाच्या अहंकाराचा नाश झाला, तुम्ही कोण ? निलेश लंके यांचा थेट हल्ला.
अमरावतीच्या मैदानात चौरंगी लढत, नवनीत राणांविरोधात कडूंचा उमेदवार कोण?
अमरावतीच्या मैदानात चौरंगी लढत, नवनीत राणांविरोधात कडूंचा उमेदवार कोण?.
पवारांची मोठी खेळी?, साताऱ्यात पाटलांची माघार, पृथ्वीराज चव्हाण लढणार?
पवारांची मोठी खेळी?, साताऱ्यात पाटलांची माघार, पृथ्वीराज चव्हाण लढणार?.
शरद पवारांचे 'हे आहेत संभाव्य उमेदवार, जयंत पाटील यादी करणार जाहीर
शरद पवारांचे 'हे आहेत संभाव्य उमेदवार, जयंत पाटील यादी करणार जाहीर.
सुशीलकुमार शिंदे हिंदूंना दहशतवादी म्हटले होते, सातपुते यांची टीका
सुशीलकुमार शिंदे हिंदूंना दहशतवादी म्हटले होते, सातपुते यांची टीका.
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.