IND vs SA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात टेन्शन, दोन स्टार खेळाडू आऊट!

कसोटी मालिकेतील दुसरा सामना संपताच वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच केली जाईल. पण दोन दिग्गज या मालिकेत खेळणं कठीण आहे.

IND vs SA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात टेन्शन, दोन स्टार खेळाडू आऊट!
IND vs SA : वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात टेन्शन, दोन स्टार खेळाडू आऊट!
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 19, 2025 | 8:34 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेले बहुतांश खेळाडू या मालिकेत खेळतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेचा भाग असणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. मिडिया रिपोर्टनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे वनडे मालिकेत खेळणार नाही. आशिया कप स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने टी20 वर लक्ष केंद्रीत करत आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की हार्दिक पांड्या दुखापतीतून सावरत आहे. तसेच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सराव करत आहे. त्यामुळे त्याला हळूहळू दुखापतीतून सावरावं लागेल. 50 षटकांचा सामना खेळणं त्याच्या जोखिमेचं ठरू शकतं. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यावर लक्ष केंद्रीत करून आहे. हार्दिक पांड्या मैदानात उतरण्यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदाकडून फिटनेस दाखवून देईल. त्यानंतर दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिकेत खेळेल.

दुसरीकडे, जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटच्या दृष्टीने वनडे मालिकेतून आराम दिला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाकडून बुमराहने भेदक गोलंदाजी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र वनडे मालिकेत खेळणं कठीण दिसत आहे. पुढच्या वर्षी भारत आणि श्रीलंकेकडे टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांचा वापर टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी जपूनच केला जात आहे. कारण टी20 वर्ल्डकप 2026 आणि आयपीएल 2026 पर्यंत वनडे मालिकांचं फार काही महत्त्व नाही. त्यानंतर वनडे वर्ल्डकप 2027 वर लक्ष केंद्रीत केलं जाईल.