AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्षित राणाने 7 विकेट घेत ठोकला मजबूत दावा, आता वनडे मालिकेतून डावलणं कठीण

India A vs South Africa A, 3rd unofficial ODI: तिसऱ्या अनौपचारिक वनडे मालिकेत दक्षिण अफ्रिकेने भारताला 73 धावांनी पराभूत केलं. पण भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. असं असताना या मालिकेत हार्षित राणाने चमकदार कामगिरी केली.

हार्षित राणाने 7 विकेट घेत ठोकला मजबूत दावा, आता वनडे मालिकेतून डावलणं कठीण
हार्षित राणाने 7 विकेट घेत ठोकला मजबूत दावा, आता वनडे मालिकेतून डावलणं कठीणImage Credit source: PTI
| Updated on: Nov 19, 2025 | 7:54 PM
Share

Harshit Rana vs South Africa A: भारतीय संघात वेगवान गोलंदाज हार्षित राणाची निवड होणं सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय होत आहे. त्याची संघात निवड होताच टीका केली जात आहे. पण हार्षित राणा आपल्या कामगिरीने टीकाकारांची तोंड बंद करताना दिसत आहे. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची निवड केली जाणार आहे. या निवडीपूर्वीच हार्षित राणाने आपला दावा दाखल केला आहे. हार्षित राणाने भारत अ संघाकडून खेळताना दक्षिण अफ्रिका अ संघाविरुद्ध चमकदार कामगिरी केली. हार्षित राणाने तीन सामन्यांच्या विकेट वनडे मालिकेत एकूण 7 विकेट घेतल्या. सर्वाधिक घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. हार्षिता राणाने तिसऱ्या वनडे सामन्यात 2 विकेट घेतले. एकीकडे दुसरे गोलंदाज महागडे ठरत असताना हार्षित राणाने 10 षटकात 47 धावा देत 2 गडी बाद केले. खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा यांची तर अक्षरश: धुलाई झाली. त्यामुळेच दक्षिण अफ्रिकेने 325 धावांचं लक्ष्य ठेवलं.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 30 नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. त्यानंतर टी20 मालिकाही होणार आहे. त्यामुळे हार्षित राणाची निवड जवळपास पक्की मानली जात आहे. हार्षित राणाने आतापर्यंत खेळलेल्या 8 वनडे सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. यात त्याचा इकोनॉमी रेट 5.82 प्रति षटक आहे. त्यामुळे हार्षित राणाची वनडे संघात निवड झाली तर आश्चर्य वाटायला नको. पण ट्रोलर्संना काय फक्त ट्रोलिंग करण्यासाठी बहाणा हवा असतो. आता इतकी चांगली कामगिरी केल्यानंतर संघात निवड होते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

भारताने क्लिन स्विपची संधी गमावली

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची अनौपचारिक वनडे मालिका होती. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने भारताने जिंकले आणि मालिका खिशात घातली. त्यामुळे तिसरा वनडे सामना जिंकून क्लिन स्विप देण्याची संधी होती. पण भारताने ही संधी गमावली. दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 325 धावा केल्या आणि विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघ 49.1 षटकात सर्व गडी गमवून 252 धावा करू शकला. या सामन्यात भारताचा 73 धावांनी पराभव झाला.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.