AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA A : टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात अपयशी, दक्षिण आफ्रिका 73 धावांनी विजयी

India A vs South Africa A 3rd unofficial ODI Match Result : इंडिया ए टीमने या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकत अप्रतिम सुरुवात केली होती. मात्र भारतीय संघ या मालिकेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरला.

IND vs SA A : टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात अपयशी, दक्षिण आफ्रिका 73 धावांनी विजयी
Ishan Kishan IND A vs SA AImage Credit source: PTI
| Updated on: Nov 19, 2025 | 7:28 PM
Share

ऋतुराज गायकवाड याने इंडिया ए टीमला दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला. ऋतुराज दोन्ही सामन्यात भारताच्या विजयाचा हिरो ठरला. ऋतुराजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक केलं. ऋतुराजच्या या खेळीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताने सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकली. भारताने 3 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप करण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात लाज राखली. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत भारत दौऱ्याचा शेवट गोड केला.

दक्षिण आफ्रिका शेवटच्या सामन्यात विजयी

उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट सामन्याचं आयोजन हे राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात भारतासमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताचा डाव हा 50 ओव्हरआधीच आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला 5 बॉलआधी ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने भारताला 252 धावांवर रोखलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे मालिकेतील शेवटचा सामना 73 धावांनी जिंकला.

भारताची फलंदाजी

ओपनर आणि उपकर्णधार ऋतुराज गायकवाडला तिसर्‍या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. ऋतुराजने 25 धावा केल्या. अभिषेक शर्मा आणि कॅप्टन तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 11-11 धावा जोडल्या. ईशान किशन आणि आयुष बदोनी या दोघांनी अर्धशतक केलं. या दोघांच्या खेळीमुळे भारताला विजयाची आशा होती. मात्र हे दोघे आऊट झाल्यानंतर भारताच्या विजयाची आशा मावळली.

भारतासाठी आयुष बदोनी याने सर्वाधिक धावा केल्या. आयुषने 66 बॉलमध्ये 8 फोरसह 66 रन्स केल्या. ईशान किशन याने 2 सिक्स आणि 3 फोरसह 67 बॉलमध्ये 53 रन्स केल्या. हर्षित राणा बेभरोशाचा ठरला. हर्षित राणा पहिल्याच बॉलवर आऊट झाला. मानव सुथार आणि प्रसिध कृष्णा या दोघांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. मात्र दोघे अपेक्षित धावगतीने धावा करण्यात अपयशी ठरले.

दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीचा शतकी धमाका

त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने या संधीचा पूर्ण फायदा घेतला. लुहान ड्री प्रिटोयरियस आणि रिवाल्डो मूनसामी या सलामी जोडीने शतक झळकावलं. प्रिटोरियस याने सर्वाधिक 123 धावा केल्या. तर मूनसामीने 107 धावांची खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 325 धावांपर्यंत मजल मारली. भारतासाठी खलील अहमद, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या