भारत-दक्षिण आफ्रिका टी 20i मालिकेआधी टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे 2 खेळाडू बाहेर

भारत आणि दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. पण पहिल्याच सामन्यात दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. त्यामुळे प्लेइंग 11चं गणित बिघडणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20i मालिकेआधी टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे 2 खेळाडू बाहेर
भारत-दक्षिण आफ्रिका टी 20i मालिकेआधी टीमला मोठा झटका, दुखापतीमुळे 2 खेळाडू बाहेर
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 6:19 PM

दक्षिण अफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने धोबीपछाड दिला. त्यानंतर वनडे मालिकेतही चांगलीच लढत दिली आणि मालिका 2-1 ने गमावली. आता पाच सामन्यांची टी20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात या मालिकेतील पहिलाच सामना 9 डिसेंबरला होत आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण अफ्रिकन संघाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण दोन खेळाडू दुखापतीमुळे आऊट झाले आहेत. त्यामुळे प्लेइंग 11 निवडताना खूपच डोकेदुखी होणार आहे. दक्षिण अफ्रिकेने याबाबतची माहिती 6 डिसेंबर रोजी दिली होती. पण त्यांच्या जागी कोण असणार हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे प्लेइंग 11 निवडताना फार काही पर्याय नसतील. दक्षिण अफ्रिकेने अधिकृतरित्या दोन खेळाडू जखमी झाल्याचं सांगितलं.

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून टोनी डी झोर्झी बाद झाला आहे. तसेच तो मायदेशी परतणार आहे. पण त्याच्या जागी कोणताही खेळाडू निवडण्यात आलेला नाही. दुसरीकडे डाव्या मांडीच्या दुखापतीतून पुनर्वसनाच्या शेवटच्या टप्प्यात वेगवान गोलंदाज क्वेना माफाका अपेक्षेनुसार प्रगती करू शकला नाही. टी20 मालिकेच्या सुरुवातीपर्यंत तंदुरुस्त होणं कठीण आहे. म्हणून त्यालाही संघातून काढून टाकण्यात आले आहे. डीपी वर्ल्ड लायन्सचा वेगवान गोलंदाज लुथो सिपामला त्याच्या ऐवजी संघात समाविष्ट करण्यात आला आहे.

वनडे मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर आणि फलंदाज टोनी डी जोरजी हे दोन खेळाडू हॅमस्ट्रिंगमुळे जखमी झाले. तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वीच हा धक्का बसला होता. दुसऱ्या वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना फलंदाजीवेळी टोनी डी झोर्झी जखमी झाला होता. वेदना असह्य झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. स्कॅन केल्यानंतर स्पष्ट झालं की दुखापतींचं कारण तीव्र आहे.

टी20 मालिकेसाठी संघ : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, रीझा हेंड्रिक्स, ओटनील बार्टमन, डोनोव्हन फेरेरा, क्वेना माफाका, जॉर्ज लिंडे.