India vs South Africa, 1st T20 Score and Updates : टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय
India vs South Africa, 1st T20 Cricket Score and Highlights In Marathi : टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाचा हा कटकमधील दुसरा टी 20i विजय ठरला.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाने टॉस गमावून हार्दिक पंड्या याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 175 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकने टीम इंडियासाठी सर्वाधिक आणि नाबाद 59 धावांची खेळी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल केली. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 12.3 ओव्हरमध्ये अवघ्या 74 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेला 74 धावांवर ऑलआऊट करण्यात एकूण 6 गोलंदाजांनी योगदान दिलं. शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाची विजयी सुरुवात, दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20i सामन्यात 101 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 80 धावाही करता आल्या नाहीत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 12.3 ओव्हरमध्ये 74 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
-
IND vs SA 1st T20I Live Score : डेवाल्ड ब्रेव्हीस आऊट, दक्षिण आफ्रिकेला सातवा झटका
जसप्रीत बुमराह याने डेवाल्ड ब्रेव्हीस याला कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. ब्रेव्हीसने 22 धावा केल्या. बुमराहने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या.
-
-
IND vs SA 1st T20I Live Score : मार्को यान्सेन आऊट, दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका, टीम इंडिया विजयाच्या दिशेने
वरुण चक्रवर्ती याने मार्को यान्सेनल याला 12 रन्सवर बोल्ड करत दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला आहे. वरुणची ही दुसरी विकेट ठरली आहे. टीम इंडियाने या विकेटसह विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : डोनोवेन फरेरा आऊट, दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत
वरुण चक्रवर्ती याने डोनोवेन फरेरा याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. जितेशने अप्रतिम कॅच घेतला. डोनोवेन फरेरा याने 7 बॉलमध्ये 5 रन्स केल्या.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाची कडक सुरुवात, दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका
हार्दिक पंड्या याने 7 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका दिला आहे. हार्दिकने डेव्हीड मिलर याला 1 रनवर विकेटकीपर जिंतेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
-
IND vs SA 1st T20I Live Score : कॅप्टन एडन मार्रक्रम क्लिन बोल्ड, अक्षर पटेलकडून गेम ओव्हर
अक्षर पटेल याने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याला क्लिन बोल्ड केलं आहे. एडनने 14 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे तिसरी विकेट गमावली. मार्रक्रम यात्यानंतर डेव्हीड मिलर मैदानात आला आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : कॅप्टन सूर्याचा यशस्वी Review, दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका, ट्रिस्टन स्टब्स आऊट
अर्शदीप सिंह याने दक्षिण आप्रिकेला दुसरा झटका दिला आहे. अर्शदीपने ट्रिस्टन स्टब्स याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. मात्र फिल्ड अंपायरने आऊट देण्यास नकार दिलं. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार यादव याने वेळ न दवडता रीव्हीव्यू घेतला. सूर्याचा हा निर्णय अचूक ठरला. अशाप्रकारे भारताला दुसरी विकेट मिळाली. स्टब्सने 9 बॉलमध्ये 14 रन्स केल्या.
-
IND vs SA 1st T20I Live Score : क्विंटन डी कॉक डक, दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका, अर्शदीपकडून शिकार
अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला आहे. अर्शदीपने क्विंटन डी कॉक याला डावातील दुसऱ्याच बॉलवर स्लिपमध्ये अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉकला भोपळाही फोडता आला नाही.
-
IND vs SA 1st T20I Live Score : दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात, 176 धावांचं आव्हान
दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून 176 धावांचा पाठलाग करण्यासाठी क्विंटन डी कॉक आणि कॅप्टन एडन मार्रक्रम ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाचा या जोडीला झटपट फोडण्याचा प्रयत्न असणार आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान, टीम इंडिया जिंकणार?
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 175 रन्स केल्या. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या याने नॉट आऊट 59 रन्स केल्या. तर तिलक वर्मा याने 26 तर अक्षर पटेल याने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. आता भारतीय गोलंदाज 175 धावांचा बचाव करण्यात यशस्वी ठरणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
-
IND vs SA 1st T20I Live Score : हार्दिक पंड्याचं चाबूक अर्धशतक, टीम इंडिया 170 पार
हार्दिक पंड्या याने 20 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं आहे. हार्दिकने अवघ्या 25 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलं. तसेच हार्दिकने यासह 100 टी 20i सिक्सही पूर्ण केले.
-
IND vs SA 1st T20I Live Score : शिवम दुबेकडून निराशा, टीम इंडियाला सहावा झटका
टीम इंडियाचा ऑलराउंडर शिवम दुबे याने निराशा केली आहे. शिवम 9 बॉलमध्ये 11 रन्स करुन आऊट झाला. शिवम बाद झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 6 आऊट 137 असा झाला आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : शिवम-हार्दिकची फटकेबाजी, टीम इंडिया किती धावा करणार?
शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या ऑलराउंडर जोडीने गिअर बदलत फटकेबाजीला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे कोणत्याच जोडीला मोठी भागीदारी करता आली नाही. मात्र आता हार्दिक आणि शिवम जोडी सेट झालीय. त्यामुळे या जोडीकडून सहाव्या विकेटसाठी जास्तीत जास्त मोठ्या भागीदारीची आशा आहे. भारताने 17 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या आहेत.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाला पाचवा झटका, अक्षर पटेल आऊट
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल 21 बॉलमध्ये 23 करुन कॅच आऊट झाला. अक्षर आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 14 ओव्हरनंतर 5 आऊट 104 असा झाला. अक्षरनंतर शिवम दुबे मैदानात आला आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : तिलक वर्मा 26 धावा करून तंबूत
तिलक वर्माच्या रुपाने टीम इंडियाला चौथा धक्का बसला आहे. तिलक वर्मा 26 धावांवर असताना लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. टीम इंडियासमोर मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : हार्दिकची फटकेबाजी, 13 व्या ओव्हरमध्ये 16 धावा
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने केशव महाराज याच्या बॉलिंगवर फटकेबाजी केली. हार्दिकने केशवरच्या ओव्हरमध्ये 2 सिक्स ठोकत एकूण 16 धावा मिळवल्या. तसेच अक्षर पटेल याने हार्दिकला चांगली साथ दिली.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाच्या 10 ओव्हरनंतर किती धावा? तिलक-अक्षरवर मोठी जबाबदारी
टीम इंडियाने 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 71 धावा केल्या आहेत. तिलक वर्मा 23 आणि अक्षर पटेल 10 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर त्याआधी शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा हे तिघे स्वस्तात आऊट झाले.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाच्या पावरप्लेमध्ये 40 धावा, अभिषेक-तिलक जोडीवर भारताची मदार
टीम इंडियाला पावरप्लेचा खास फायदा घेता आला नाही. टीम इंडियाने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 40 धावा केल्या आहेत. तसेच टीम इंडियाने शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्या रुपात 2 विकेट्स गमावल्या. तिलक वर्मा 11 आणि अभिषेक शर्मा 9 धावांवर नाबाद खेळत आहेत. या जोडीवर आता टीम इंडियासाठी भक्कम भागीदारी करण्याची जबाबदारी आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाला दुसरा झटका, कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, युवा ब्रिगेडची सुमार सुरुवात
टीम इंडियाला दुसरा आणि मोठा झटका लागला आहे. लुंगी एन्गिडी याने शुबमन गिल याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याला आऊट केलं आहे. सूर्याने 11 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. सूर्या आऊट झाल्याने टीम इंडियाची 2 आऊट 17 अशी स्थिती झाली आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Score : टीम इंडियाला पहिला झटका, शुबमन गिल आऊट
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला पहिल्या ओव्हरमध्ये पहिला आणि मोठा झटका दिला आहे. लुंगी एन्गिडी याने भारताच्या डावातील पहिल्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर शुबमन गिल याला आऊट केलं. शुबमनने 4 धावा केल्या.
-
IND vs SA 1st T20I Live Score : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, शुबमन-अभिषेक मैदानात
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्रक्रम(कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी आणि एनरिक नॉर्तजे.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, बॅटिंग की बॉलिंग?
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात टॉस जिकंला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्रक्रम याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया किती धावा करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : टी 20i सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्कराम(कॅप्टन), टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, ॲनरिक नॉर्खिया, लुंगी एन्गिडी, रीझा हेंड्रिक्स, ओटनील बार्टमन, डोनोव्हन फरेरा, क्वेना माफाका आणि जॉर्ज लिंडे.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : टी 20i सीरिजसाठी टीम इंडिया
अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
-
IND vs SA 1st T20I Live Updates : टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका पहिला टी 20i सामना
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर टी 20i मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. उभयसंघातील पहिला सामना हा कटकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
Published On - Dec 09,2025 6:17 PM
