IND vs SA : कोलकाता कसोटीत दुसऱ्यांदा असं घडलं, भारताला आघाडीसाठी अजूनही 122 धावांची गरज

भारत दक्षिण अफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातील पहिल्या डावाचा पहिला दिवस संपला. या दिवसावर भारताचं वर्चस्व राहीलं. कोलकात्यात असं यापूर्वी एकदा घडलं आहे.

IND vs SA : कोलकाता कसोटीत दुसऱ्यांदा असं घडलं, भारताला आघाडीसाठी अजूनही 122 धावांची गरज
IND vs SA : कोलकात्या कसोटीत दुसऱ्यांदा असं घडलं, भारताला आघाडीसाठी अजूनही 122 धावांची गरज
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 14, 2025 | 7:34 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी 11 विकेट पडल्या. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण निर्णय काय दक्षिण अफ्रिकेच्या पथ्यावर पडला नाही. दक्षिण अफ्रिकेने चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर डाव गडगडला. एडन मार्करम आणि रियान रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. रिकल्टन 23 धावा करून बाद झाला आणि डाव गडगडला. त्यानंतर दणादण विकेट पडत गेल्या. मार्करम 31 धावांवर असताना बुमराहच्या गोलंदाजीवर पंतच्या हाती झेल जात बाद झाला. त्यानंतर 159 धावांपर्यंत संपूर्ण संघ तंबूत गेला. यावरून ही खेळपट्टी फलंदाजीसाठी प्रतिकूल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे भारतासाठीही 159 धावा गाठून त्यावर अधिक धावा करणं वाटतं तितकं सोपं नाही. भारताने 1 विकेट गमवून पहिल्या दिवशी 37 धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वाल 27 चेंडूत 3 चौकार मारत 12 धावा करून बाद झाला. कोलकात्यात जे काही पहिल्या दिवशी ते दुसऱ्यांदा घडलं आहे.

कोलकात्यात पहिल्या दिवशी 11 विकेट पडल्या होत्या

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 11 विकेट पडल्या. यापूर्वी भारत बांग्लादेश कसोटी सामन्यात असं घडलं होतं. 2019 मध्ये याच मैदानावर पिंक बॉल कसोटी खेळली गेली होती. तेव्हा दोन्ही संघांच्या मिळून 13 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर आता कुठे इतक्या विकेट पडल्या आहेत. 13 विकेटची बरोबरी तर झाली नाही पण 11 विकेट पडल्या आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल यांनी विकेट पडू दिली नाही. आता दुसऱ्या दिवशी काय होतं याकडे मात्र लक्ष असणार आहे.

वॉशिंग्टन सुंदरला या कसोटी सामन्यात प्रमोशन देण्यात आलं आहे. साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आहे. त्यामुळे त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. पण खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवशी परीक्षा असणार आहे. अजूनही भारतीय 122 धावांनी पिछाडीवर आहे. दिसायला ही धावसंख्या खूप छोटी असली तरी ती गाठणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण दक्षिण अफ्रिकेच्या अवघ्या 102 धावांवर 10 विकेट गमावल्या होत्या.