AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संपूर्ण संघ असाच खेळतो’, ऋषभ पंतने दक्षिण अफ्रिकी फलंदाजांचा डाव ओळखला Watch Video

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होत आहे. या सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहीला. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी भारताला अद्याप 122 धावांची गरज आहे.

'संपूर्ण संघ असाच खेळतो', ऋषभ पंतने दक्षिण अफ्रिकी फलंदाजांचा डाव ओळखला Watch Video
'संपूर्ण संघ असाच खेळतो', ऋषभ पंतने दक्षिण अफ्रिकी फलंदाजांना डिवचलं Watch VideoImage Credit source: PTI
| Updated on: Nov 14, 2025 | 6:20 PM
Share

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 159 धावांवर बाद झाला. खरं तर 57 धावांपर्यंत दक्षिण अफ्रिकेची एकही विकेट पडली नव्हती. पण त्यानंतर 102 धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. एकीकडे दक्षिण अफ्रिकेची घसरगुंडी सुरु असताना दुसरीकडे ऋषभ पंतचं वक्तव्य चर्चेत आहे. ऋषभ पंत आपल्या बिंधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्या बोलण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना असाच एक वक्तव्य त्याने केलं. त्याचं हे वक्तव्य स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं असून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना ऋषभ पंत म्हणाला की, सगळे असचं करणार आहे. ते सर्व जण मागून चेंडू खेळतात. क्षेत्ररक्षकांना आत ठेवता येते. संपूर्ण संघ असाच खेळतो. त्यानंतर रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. तेव्हा अफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमा फलंदाजी करत होता. तेव्हा पंतने जडेजाला सांगितलं की, जड्डू भाई इथे थोडासा ठेव. जर त्याने स्वीप मारला तर तो झेलबाद होईल. सिंगलसाठी नको, हा स्वीपवाला आहे. झेलसाठी ठेव. यानंतर बावुमा कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलच्या हातात झेल देऊन बाद झाला.

दक्षिण अफ्रिका संघाकडून एडन मार्करमने सर्वाधिक 31 आणि रियान रिकल्टने 23 धावा केल्या. याशिवाय कोणीही चांगली फलंदाजी करू शकलं नाही. कसोटीच त्रिशतक ठोकणारा वियान मुल्डरही 24 धावांवर बाद झाला. तर मार्को यानसेन आणि केशव महाराज विना खातं खोलता तंबूत परतले. खरं तर दक्षिण अफ्रिकेचा निम्मा संघ एकट्या जसप्रीत बुमराहने तंबूत पाठवला. त्याने 5 विकेट काढल्या. तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या. तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.