Virat Kohli : विराट कोहलीचा शतकी तडाखा, महिन्याभरात दुसरी वनडे सेंच्युरी

विराट कोहलीचं (Virat Kohli Century) हे गेल्या महिन्याभरातील दुसरं एकदिवसीय शतक ठरलंय.

Virat Kohli : विराट कोहलीचा शतकी तडाखा, महिन्याभरात दुसरी वनडे सेंच्युरी
Image Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 5:43 PM

Virat Kohli Century : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने (Virat Kohli) नववर्षाची शानदार आणि अपेक्षित सुरुवात केली आहे. विराटने कोहलीने श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय (IND vs SL) सामन्यात खणखणीत शतक ठोकलंय. विराटने हे शतक 80 बॉलमध्ये पूर्ण केलं. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे एकूण 73 वं शतक ठरलंय. तर वनडे क्रिकेटमधील हे 45 शतक ठरलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे विराटाने या शतकासह मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तसंच विराटचं हे गेल्या महिन्याभरातील दुसरं एकदिवसीय शतक ठरलंय. (ind vs sl 1st odi team india virat kohli century against sri lanka and level to sachin tendulkar most one day hundred in home baraspara stadium guwahati)

विराट कोहली याचा शतकी धमाका

हे सुद्धा वाचा

विराटने या शतकासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनने भारतात 19 एकदिवसीय शतक ठोकले आहेत. तर आता विराटने या विक्रमाची बरोबरी साधली आहे.

महिन्याभरातील दुसरं एकदिवशीय शतक

विराटचं महिन्याभरातील हे दुसरं शतक ठरलंय. याआधी विराटने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बरोबर एक महिन्याआधी 10 डिसेंबरला शतकी खेळी केली होती. विराटने तेव्हा 91 बॉलमध्ये 11 फोर आणि 2 सिक्ससह 113 रन्स केल्या होत्या. हा सामना चिटगावमध्ये खेळवण्यात आला होता. तर आता विराटने श्रीलंका विरुद्ध 87 बॉलमध्ये 9 चौकार आणि 3 सिक्ससह 113 रन्स केल्या.

श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं आव्हान

दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं लक्ष्य दिलं आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 373 धावा केल्या. विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माने 83 धावांची शानदार खेळी केली. शुबमन गिलने 70 रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 28 धावांचं योगदान दिलं. केएल राहुलला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तो 39 रन्स करुन मैदानाबाहेर गेला. हार्दिकने 14 रन्स केल्या. अक्षरने 9 धावा जोडल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी अनुक्रमे नाबाद 4 आणि 7 धावा केल्या. श्रीलंकेकडून कसून राजिथाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिलशान मधुशंका, चामिका करुणारत्ने, दासून शनाका आणि धनांजया डी सिलिव्हा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेललागे, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.