AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 3rd T20I : टीम इंडिया सीरिज जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला देणार संधी?

तिसरी आणि सीरिज डिसायडर मॅच ही निर्णायक आणि तितकीच रंगतदार ठरणार आहे. तिसरा सामना हा 7 जानेवारीला पार पडणार आहे.

IND vs SL, 3rd T20I : टीम इंडिया सीरिज जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला देणार संधी?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 06, 2023 | 5:26 PM
Share

राजकोट : श्रीलंकेने टीम इंडियावर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 16 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता तिसरी आणि सीरिज डिसायडर मॅच ही निर्णायक आणि तितकीच रंगतदार ठरणार आहे. तिसरा सामना हा 7 जानेवारीला पार पडणार आहे. टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी दुसऱ्या सामन्यात निराशा केली. अपवाद वगळता टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी निराशा केली. तर त्याआधी गोलंदाजांनीही धावा लुटवल्या. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. (ind vs sl 3rd t20i team india and sri lanka probable playing eleven for series desider match at rajkot)

टॉप ऑर्डर ढेर झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांनी चांगली लढत दिली, मात्र विजय मिळवता आला नाही. श्रीलंकेने विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले. मात्र टीम इंडियाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 190 धावाच करता आल्या.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?

अर्शदीपने दुसऱ्या सामन्यातून कमबॅक केलं. मात्र अर्शदीपचं निराशाजनक कामगिरी केली. अर्शदीपने नो बॉलची हॅट्रिक टाकली. अर्शदीपसह शिवम मावी आणि उमरान मलिकनेही निराशा केली. फंलंदाजांनी तर निराशाच केली. टॉप ऑर्डरमधील इशान किशन, शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी स्वस्तात माघारी परतले.

अनचेंज श्रीलंका?

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने शनाकाच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत टीम इंडिया चांगली टक्कर दिली. साधारणपणे विजयी प्लेइंग इलेव्हन टीम बदलली जात नाही. त्यात तिसरा आणि महत्त्वाचा सामना आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी श्रीलंकेत बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.

टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), ईशान किशन, शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी/ हर्षल पटेल, उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि युजवेंद्र चहल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?