IND vs SL : बीसीसीआयकडून श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I सीरिजसाठी वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना केव्हा?

INDW vs SLW T20i Series Schedule : श्रीलंका क्रिकेट टीम टी 20i सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघात 21 ते 30 डिसेंबर दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.

IND vs SL : बीसीसीआयकडून श्रीलंकेविरुद्धच्या टी 20I सीरिजसाठी वेळापत्रक जाहीर, भारताचा पहिला सामना केव्हा?
IND vs Sri Lanka Women T20i Series 2025
Image Credit source: Bcci
| Updated on: Nov 28, 2025 | 3:25 PM

वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर सध्या रिलॅक्स मोडवर आहे. त्यामुळे टीम इंडिया आता आपली पुढील मालिका केव्हा खेळणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना होती. अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. टीम इंडिया डिसेंबर महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. बीसीसीआयने या टी 20i मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया-श्रीलंका टी 20i सीरिज

टी 20i मालिकेला 21 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विशाखापट्टणममध्ये होणार आहे. दुसरा सामना हा 23 डिसेंबरला विशाखापट्टणममध्येच होणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा 26 डिसेंबरला तिरुवनंतरपुरममध्ये होणार आहे. तसेच चौथा आणि पाचवा सामनाही याच मैदानात होणार आहे.

भारत-श्रीलंका टी 20i मालिकेचं वेळापत्रक

  1. पहिला सामना, 21 डिसेंबर, विशाखापट्टणम
  2. दुसरा सामना, 23 डिसेंबर, विशाखापट्टणम
  3. तिसरा सामना, 26 डिसेंबर, तिरुवअनंतरपुरम
  4. चौथा सामना, 28 डिसेंबर, तिरुवअंतरपुरम
  5. पाचवा सामना, 30 डिसेंबर, तिरुवअंतरपुरम

स्मृती मंधाना खेळणार की नाही?

टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना या मालिकेत खेळणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. स्मृतीच्या लग्नात विघ्न आलं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे. स्मृतीचे वडील आणि त्यानंतर तिचा होणार पती या दोघांची अचानक तब्येत बिघडल्याने लग्नात विघ्न आलं. त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आलंय. त्यामुळे स्मृती या मालिकेसाठी उपलब्ध असणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

उभयसंघातील आकडेवारी

दरम्यान टीम इंडिया श्रीलंकेवर टी 20I क्रिकेटमध्ये वरचढ राहिल्याचं आकडेवारीवरुन सिद्ध होतं. भारत विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यात आतापर्यंत एकूण 26 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 26 पैकी सर्वाधिक 20 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेला फक्त 5 सामनेच जिंकता आले आहेत. उभयसंघातील एकमेव सामना हा बरोबरीत राहिला आहे. त्यामुळे टीम इंडियाच श्रीलंकेविरुद्ध ही 5 सामन्यांची मालिका जिंकेल,असा विश्वास चाहत्यांना आहे.