IND vs SL : गौतम गंभीरकडून टीम इंडियाचं प्रशिक्षण सुरु, श्रीलंकेत पोहोचताच सराव सुरु Watch Video
टीम इंडिया तीन टी20 आणि तीन वनडे मालिकांसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या नेतृत्वात हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. असं असताना गौतम गंभीरच्या नेतृत्वात प्रशिक्षण सुरु झालं आहे.
टी20 फॉर्मेटमधून दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर संघ बांधणीचं काम जोरात सुरु आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा नजरेसमोर ठेवून कामाला सुरुवात झाली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीरचा कार्यकाळही सुरु झाला आहे. असं असताना पुढच्या आयसीसी स्पर्धांना सामोरं जाण्यापू्र्वी प्रत्येक दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. राहुल द्रविड प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर गौतम गंभीरने सूत्र हाती घेतली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने मंगळवारी श्रीलंकेत पहिला सराव केला. 27 जुलैपासून टीम इंडिया तीन सामन्याती टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर 2 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी शुबमन गिल याची निवड झाली आहे.
दुसरीकडे, वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दिग्गज खेळाडू सराव शिबिरात भाग घेतील. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी दोन्ही खेळाडू खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र हे दोघंही खेळाडू खेळणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान, टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजाला वनडे मालिकेतून डावलण्यात आलं आहे. रवींद्र जडेला विश्रांती दिल्यांच गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐃𝐚𝐲 1️⃣ 🏏#SonySportsNetwork #TeamIndia #SLvIND pic.twitter.com/TploJUhTdW
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
The new coach is ready 🤩🇮🇳#SonySportsNetwork #SLvIND #TeamIndia | @GautamGambhir pic.twitter.com/YFESCntXyz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
Now watching: #TeamIndia‘s new T20I captain 🇮🇳💙
Go well, Surya Dada 👏#SonySportsNetwork #SLvIND | @surya_14kumar pic.twitter.com/aXSic8Z4PS
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 23, 2024
रियान परागला टी20 आणि वनडे अशा दोन्ही संघात स्थान मिळालं आहे. तर श्रेयस अय्यरला वनडे संघात घेतलं आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर श्रेयस अय्यरला संघातून डावलण्यात आलं होतं. इतकंच काय तर देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास चालढकलपणा करत असल्याने बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून वगळलं होतं. आता पुन्हा एकदा श्रेयसला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली आहे.
टीम इंडिया टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिष्णोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.
टीम इंडिया वनडे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हार्षित राणा.