AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : सुपर 4 फेरीत हार्षित राणाने दिल्या चार षटकात 54 धावा, तरी ठरतोय हिरो

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील भारत विरुद्ध श्रीलंका सामना अतितटीचा ठरला. या सामन्याचा निकाल सुपर 4 फेरीत लागला. या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा वेगवान गोलंदाज हार्षित राणाने सर्वाधिका धावा दिल्या. तरीही त्याचं कौतुक होत आहे. त्या मागचं कारण काय? समजून घ्या.

IND vs SL : सुपर 4 फेरीत हार्षित राणाने दिल्या चार षटकात 54 धावा, तरी ठरतोय हिरो
IND vs SL : सुपर 4 फेरीत हार्षित राणाने दिल्या चार षटकात 54 धावा, तरी ठरतोय हिरोImage Credit source: PTI
| Updated on: Sep 27, 2025 | 4:49 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर 4 फेरीतील शेवटचा सामना पार पडला. तसं पाहीलं तर हा सामना औपचारिक होता. कारण भारताने अंतिम फेरीत धडक मारली होती. तर श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. पण श्रीलंकेला स्पर्धेचा शेवट गोड, तर भारताला विजयी घोडदौड कायम ठेवायची होती. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व क्रीडाप्रेमींच्या दृष्टीने वाढलं होतं. झालंही तसंच. भारताने 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेने या धावांचा पाठलाग करताना 202 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात धावांचा अक्षरश: पाऊस पडला. अभिषेक शर्माने भारताच्या डावात आक्रमक खेळी केली. तर श्रीलंकेकडून पाथुम निस्संकाने शतकी खेळी भारतीय गोलंदाजांना धुतलं. त्याने संघाला विजयाच्या वेशीवर आणलं होतं. पण या सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या हार्षित राणाने शेवटी असं केली एका षटकातच जिरोचा हिरो झाला. या सामन्याचं चित्र बदलण्यास कारणीभूत ठरला.

हार्षित राणाच्या हाती 20वं षटक सोपवण्यापूर्वी त्याने 3 षटकात 43 धावा दिल्या होत्या. तरीही कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास टाकला. श्रीलंकेला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता होती. श्रीलंकेने 4 विकेट गमवून 19 व्या षटकापर्यंत 191 धावा केल्या होत्या. खेळपट्टीवर पाथुम निस्संका 57 चेंडूत 107 धावा आणि अष्टपैलू दासुन शनाका 8 चेंडूत 14 धावा करून खेळत होता. त्यामुळे हा सामना हातून गेला असंच वाटत होतं. पण शेवटच्या षटकात हार्षित राणाने कमाल केली.

हार्षित राणा असा झाला हिरो

हार्षित राणाच्या पहिल्या चेंडूवर पाथुम निस्संका वरुण चक्रवर्तीच्या हाती झेल देत तंबूत परतला. त्यामुळे श्रीलंकेला मोठा धक्का बसला. त्यानंतर 5 चेंडूत 11 धावांची गरज होती. तेव्हा जनिथ लियानागेने 2 धावा घेतल्या. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. चौथ्या चेंडूवर दासुन शनाकाने 2 धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर शनाकाने चौकार मारला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. पण हार्षित राणाच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. हा सामना नंतर भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.