IND vs SL : टीम इंडियाचा फायनलआधी पाकिस्तानला दणका, मोठा रेकॉर्ड ब्रेक
T20i Asia Cup 2025 : क्रिकेट चाहत्यांना आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याची प्रतिक्षा आहे. मात्र या सामन्याआधीच टीम इंडियाने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे.

टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये रविवारी 28 सप्टेंबरला आशिया कप ट्रॉफीसाठी महाअंतिम सामना होणार आहे. टीम इंडियाने सुपर 4 फेरीत धमाकेदार कामगिरी केली आहे. तसेच टीम इंडियाने पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 अशा 2 वेळा लोळवलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे टीम इंडियाच आशिया कपसाठी प्रबळ दावेदार समजली जात आहे. टीम इंडियाने या महाअंतिम सामन्याआधी पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
टीम इंडियाने सुपर 4 फेरीतील शेवटच्या सामन्यात शुक्रवारी 26 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमध्ये श्रीलंकेविरुद्ध धमाका केला. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 200 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने अभिषेक शर्मा याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. भारत यासह या स्पर्धेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला.
पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक
तसेच टीम इंडियाने 194 धावा करताच मोठा कारनामा केला. टीम इंडियाने टी 20I आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानच्या नावावर असलेल्या दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने 2022 साली हाँगकाँग विरुद्ध 2 विकेट्स गमावून 193 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने 2 वर्षांनंतर पाकिस्तानचा हा रेकॉर्ड ब्रेक केला.
सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
दरम्यान टी 20I आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा टीम इंडियाच्या नावावर आहे. टीम इंडियाने 2022 साली अफगाणिस्तान विरुद्ध 2 विकेट्स गमावून 212 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 202 धावा केल्या. टीम इंडियाची टी 20I आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात 200 पार पोहचण्याची एकूण दुसरी वेळ ठरली.
टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ
दरम्यान भारत आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 मधील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीनंतर सुपर 4 फेरीतही विजयी झंझावात कायम ठेवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान आणि ओमानवर विजय मिळवला. त्यानंतर भारताने सुपर 4 फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशवर मात केली.
