IND vs SL: कुलदीप यादव न खेळताच टीम इंडियाच्या बाहेर, ‘या’ खेळाडूचा संघात समावेश

| Updated on: Mar 21, 2022 | 4:53 PM

भारताने मोहालीमधल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता बंगळुरुमध्ये दुसरा डे-नाईट कसोटी (India vs Sri lanka Day Night Test) सामना रंगणार आहे.

IND vs SL: कुलदीप यादव न खेळताच टीम इंडियाच्या बाहेर, या खेळाडूचा संघात समावेश
कुलदीप यादव
Image Credit source: File photo
Follow us on

नवी दिल्ली: भारताने मोहालीमधल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आता बंगळुरुमध्ये दुसरा डे-नाईट कसोटी (India vs Sri lanka Day Night Test) सामना रंगणार आहे. या कसोटीआधी टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघातून वगळण्यात आलं आहे. कुलदीप यादवची जागा अक्षर पटेल घेणार आहे. अक्षर पटेलने (Axar Patel) फिटनेस टेस्ट पास केली आहे. भारत-श्रीलंकेमध्ये मोहालीत झालेल्या कसोटी सामन्याआधी अक्षर पटेल भारतीय संघाचा दाखल झाला. क्रिकबजच्या वृत्तानुसार 27 वर्षाच्या कुलदीप यादवची अक्षर पटेलचा बॅकअप म्हणून संघात निवड करण्यात आली नव्हती. संघाला तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांची आवश्यकता नाही, असं संघ व्यवस्थापनाचं मत आहे.

रवींद्र जाडेजाही टीमचा भाग आहे. त्याशिवाय सौरभ कुमार आणि अक्षर पटेलही संघात आहे. आर.अश्विन आणि जयंत यादवच्या रुपात आधीच दोन ऑफस्पिनर संघात आहेत.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 22 फेब्रुवारीला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. अक्षर पटेल रिहॅबमध्ये असून तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होणार नाही, असं त्यावेळी बीसीसीआयने म्हटलं होतं. अक्षर पटेल डिसेंबर 2021 मध्ये मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो वेगवेळ्या कारणांमुळे भारतीय संघापासून लांबच आहे.

अक्षर पटेल आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळला असून त्याने 36 विकेट घेतल्यात. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. भारताने मोहालीमध्ये खेळलेला पहिला कसोटी सामना तीन दिवसांच्या आत जिंकला. भारतीय संघ 9 मार्चपर्यंत मोहालीमध्येच रहाणार आहे. त्यानंतर बंगळुरुला रवाना होईल.

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) प्रियंक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेट कीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश याद, मोहम्मद शमी.

संबंधित बातम्या:
Mumbai Indians IPL 2022: खेळाडूंसाठी अख्खं फाईव्ह स्टार हॉटेल केलं बुक, 13 हजार चौरस मीटरमध्ये उभारला ‘MI Arena’
IPL 2022: ना धोनी, ना विराट-रोहित… हा भारतीय खेळाडू श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार, कारण ऐकून तुम्हीही हसाल
IND vs BAN Head to Head Records, Women’s World Cup 2022: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात कोणाचं पारडं जड?