AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI Live Streaming Super 8 : विंडीज विरूद्धच्या सामन्याची वेळ बदलली? सुपर 8 मॅच किती वाजता?

India vs West Indies T20 World Cup 2026 Live Match Score : टीम इंडिया हा सामना जिंकली तर वेस्ट इंडिजला परतीचा प्रवास करावा लागेल. तसेच विंडीजने मैदान मारलं तर भारताचं पॅकअप होईल. दोन्ही संघांसाठी सामना अटीतटीचा आहे.

IND vs WI Live Streaming Super 8 : विंडीज विरूद्धच्या सामन्याची वेळ बदलली? सुपर 8 मॅच किती वाजता?
India vs West Indies Super 8 Live StreamingImage Credit source: Bcci and Icc X Account
| Updated on: Feb 28, 2026 | 5:45 PM
Share

गतविजेता टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचणार की नाही? हे रविवारी 1 मार्चला निश्चित होणार आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना 1 मार्चला खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजचं आव्हान आहे. वेस्ट इंडिजचाही हा सुपर 8 फेरीतील तिसराच सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी सेमी फायनलच्या हिशोबाने हा सामना आर या पार असाच आहे. दोघांपैकी 1 विजयी संघ उपांत्य फेरीत पोहचेल. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या दोन्ही संघात विजयासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहायला मिळण्याची अधिक शक्यता आहे. भारत विरुद्ध विंडीज हा सामना कधी आणि कुठे होणार? हे या निमित्ताने जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना 1 मार्चला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना कोलकातातील इडन गार्डन्समध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध विंडीज सुपर 8 सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

विंडीज वरचढ, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

दरम्यान विंडीज विरूद्धच्या आकडेवारीमुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजने या 4 पैकी 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं आहे. तर टीम इंडियाला 1 सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे टीम इंडिया विंडीज विरुद्ध दुसरा विजय मिळवून सेमी फायनलमध्ये धडक देण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...