IND vs SA : रोहित-विराट आऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम जाहीर, मुंबईच्या खेळाडूकडे कॅप्टन्सी

Rohit Sharma and Virat Kohli : टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट, वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयने पाहुण्या संघाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. सोबतच इंडिया ए टीमची घोषणा केली आहे.

IND vs SA : रोहित-विराट आऊट, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजसाठी टीम जाहीर, मुंबईच्या खेळाडूकडे कॅप्टन्सी
Rohit Sharma and Virat Kohli Team India
Image Credit source: Getty Images
| Updated on: Nov 05, 2025 | 7:36 PM

बीसीसीआय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. तसेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध होणाऱ्या 3 अनऑफिशीयल वनडे मॅचेससाठी इंडिया ए टीमची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विस्फोटक बॅटिंगने भारताला विजयी करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचा या संघात समावेश करण्यात आलेला नाही. रोहित आणि विराट या मालिकेत खेळणार नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत होती. बीसीसीआयनेही त्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

तिलक वर्मा कॅप्टन

बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा याला कर्णधार केलं आहे. तसेच पुणेकर ऋतुराज गायकवाड यालाही संघात संधी दिली आहे. ऋतुराजला उपकर्णधारपदाची सुत्र देण्यात आली आहेत. या मालिकेचा थरार 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.

3 सामने आणि 1 मैदान

उभयसंघातील या तिन्ही वनडे मॅचेसचं आयोजन हे एकाच मैदानात करण्यात आलं आहे. हे सामने राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे.

तसेच या मालिकेसाठी टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्मा याला संधी देण्यात आली आहे. अभिषेकने गेल्या काही महिन्यांत बॅटिंगने अप्रतिम कामगिरी केली आहे. ऑलराउंडर रियान पराग याचा समावेश करण्यात आला आहे. विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन यालाही संधी मिळाली आहे. हर्षित राणा, प्रसिध कृष्णा खलील अहमद आणि अर्शदीप सिंह यांच्यावर वेगवान गोलंदाजीचा धुरा असणार आहे.

युवा खेळाडूंना संधी

तसेच निवड समितीने आयपीएल गाजवणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंना संधी दिली आहे. या खेळाडूंमध्ये प्रभसिमरन सिंह, आयुष बदोनी, निशांत सिंधु, विपराज निगम आणि मानव सुथार यांचा समावेश आहे.

एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडिया

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, गुरुवार, 13 नोव्हेंबर, राजकोट

दुसरा सामना, रविवार, 16 नोव्हेंबर, राजकोट

तिसरा सामना, बुधवार, 19 नोव्हेंबर, राजकोट

वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीम : तिलक वर्मा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, इशान किशन (विकेटकीपर), आयुष बदोनी, निशांत सिंधू, विपराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) प्रसीध कृष्णा आणि खलील अहमद.