AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंडिया ए संघाची परीक्षा, तीन सामन्यासाठी त्यांच्याच भूमीत होणार चाचपणी

India A tour of Zew Zealand: भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा ऑक्टोबर महिन्यात असून त्याआधी इंडिया ए संघाची अग्निपरीक्षा होणार आहे. कसं आहे वेळापत्रक ते जाणून घ्या..

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंडिया ए संघाची परीक्षा, तीन सामन्यासाठी त्यांच्याच भूमीत होणार चाचपणी
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी इंडिया ए संघाची परीक्षा, तीन सामन्यासाठी त्यांच्याच भूमीत होणार चाचपणीImage Credit source: PTI
| Updated on: Sep 01, 2026 | 6:33 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची करो या मरोची स्थिती आहे. आता भारताच्या दोन कसोटी मालिका शिल्लक आहेत. यात भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असताना न्यूझीलंडविरुद्धचा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यापूर्वी इंडिया ए संघाची चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. इंडिया ए संघ न्यूझीलंडला मल्टी डे सामने खेळण्यासाठी जाणार आहे. यासाठी न्यूझीलंड क्रिकेटने टीम इंडियाचा दौरा आणि प्लंकेट शील्ड देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या दौऱ्यात इंडिया ए संघ न्यूझीलंड ए विरुद्ध तीन 4 दिवसीय सामने खेळणार आहे.

इंडिया ए विरुद्धची मल्टी डे कसोटी सामना 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची कसोटी संघासाठी विचार होऊ शकतो. कारण भारताचा मुख्य संघ 19 नोव्हेंबर 2026 पासून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे इंडिया ए संघातील खेळाडूंची चाचपणी होणार यात काही शंका नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वीही असंच झालं होतं.

इंडिया ए विरुद्ध न्यूझीलंड ए वेळापत्रक

  • पहिला 4 दिवसीय सामना, 24 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर (बर्ट सटक्लिफ ओवल, लिंकन)
  • दुसरा 4 दिवसीय सामना, 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर (हेगले ओवल, क्राइस्टचर्च)
  • तिसरा 4 दिवसीय सामना, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर (बर्ट सटक्लिफ ओवल, लिंकन)

दुसरीकडे, न्यूझीलंड क्रिकेट इतिहासात भारताचा सर्वात मोठा दौरा असणार आहे. भारताचा मुख्य संघ या दौऱ्यात 5 टी20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका असणार आहे. 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान पाच सामन्यांची वनडे मालिका खेळेल. तर 19 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबरला दोन कसोटी सामने होतील.

2019 नंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी खेळणार

भारतीय संघ 2019 नंतर न्यूझीलंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. तर व्हाईट बॉल क्रिकेटही 2022 नंतर खेळणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची परीक्षा असणार आहे. विदेशी भूमीत आपली क्षमता सिद्ध करण्याची एक संधी असणार आहे.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा