AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना होणार की नाही? नाणेफेकीपू्र्वीच आली मोठी अपडेट

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची मोर्चेबांधणी सुरु आहे. सहा महिन्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत नव्या जोशाने उतरणार आहे. त्यासाठी आतापासून तयारी सुरु झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी20 मालिका त्याचाच एक भाग आहे. पण या मालिकेतील दुसरा सामना होणार की नाही? याबाबत साशंकता आहे.

IND vs AUS : भारत ऑस्ट्रेलिया दुसरा टी20 सामना होणार की नाही? नाणेफेकीपू्र्वीच आली मोठी अपडेट
| Updated on: Nov 25, 2023 | 5:45 PM
Share

मुंबई : भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 2 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 209 धावांचं आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी तिरुवनंतपुरम येथे दाखल झाले असून सराव सुरु झाला आहे. पण आता दुसरा सामना होणार की नाही? हा प्रश्न समोर आला आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे. तिरुवनंतपुरम येथे गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. रविवारीही पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे सामन्यावर तसा काही फरक पडणार नाही. त्यामुळे सामना पूर्ण होईल असंही सांगण्यात येत आहे. पण पावसाने हजेरी लावली तर काही षटकं कमी होण्याची शक्यता आहे. तर दिवसभराचं तापमान 25 डिग्रीपर्यंत असू शकतं.

तिरुवनंतपुरम येथील खेळपट्टी विशाखापट्टणम सारखीच असणार आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे गोलंदाज तितकी चांगली कामगिरी करतील. तितकं जिंकण्याची संधी अधिक असणार आहे. दुसरीकडे, या मैदानात मोठी धावसंख्या झाली नसल्याचा मागचा रेकॉर्ड सांगत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्या डावात 114 धावा झाल्या आहेत. दोन वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार प्रथम गोलंदाजी करणं पसंत करतील. असं असलं तरी काय निर्णय घ्यावा हे त्या त्या कर्णधारावर अवलंबून असेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड/मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेटकीपर), सीन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, एडम झाम्पा.

भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई/आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत